ETV Bharat / state

Chandrasekhar Bawankule News: राहुल गांधींच्या विधानामुळे ओबीसींचा अपमान, भाजप राज्यभर आंदोलन करणार- चंद्रशेखर बावनकुळे - काँग्रेस खासदार राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या मोदी आडनावाच्या टिप्पणीमुळे तेली समाजाचाच नाही तर एकूणच ओबीसींचा अपमान झाला आहे. त्याचा भाजपने तीव्र शब्दात निषेध केला आहे. भारतीय जनता पक्षातर्फे राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी राज्यभर आंदोलन छेडले जाणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.

Chandrasekhar Bawankule News
चंद्रशेखर बावनकुळे
author img

By

Published : Mar 24, 2023, 9:11 AM IST

मुंबई : सुरत न्यायालयाने मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दोषी ठरवले आहे. त्यांच्या वक्तव्याविरोधात सुरत कोर्टात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. 2019 मध्ये राहुल गांधींनी मोदी आडनाव असलेले सगळे चोर का आहेत, कर्नाटकमध्ये झालेल्या सभेत असे विधान केले होते. गुरुवारी झालेल्या सुनावणीत सुरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे, त्यांचे समर्थक याप्रकरणी राज्यभर आंदोलन करत आहेत.

काँग्रेसची जातीयवादी वृत्ती : याप्रसंगी बोलताना बावनकुळे म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जाहीर सभेत मोदी यांच्या आडनावावरून अपमानास्पद सवाल उपस्थित केला होता. तसेच राहुल गांधी यांनी तेली समाजासोबतच एकूणच ओबीसी समाजाचा अपमान केल्यामुळे आपण त्यांचा निषेध करत आहोत. आम्हाला जातीयवादी ठरवण्यापेक्षा राहुल गांधी यांच्या या प्रकारामुळे काँग्रेसची जातीयवादी वृत्ती समोर आली आहे. राजेशाही मानसिकतेतून अजूनही राहुल गांधी बाहेर आले नाही आहेत, असे यावरून स्पष्ट होते. देशामध्ये कायदा व संविधान सर्वश्रेष्ठ आहे, मग त्यापुढे कोणी कितीही मोठा असू दे. हे एकंदरीत न्यायालयाच्या निर्णयात दिसते, असेही बावनकुळे म्हणाले.

शिक्षा भोगणार की नाही? पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की, न्यायालयाने एकदा शिक्षा दिल्यानंतर राहुल गांधी आता आपणच बळी असल्याचा केविलवाणा आव आणू कसे शकतात. तेली समाजासह एकूणच ओबीसी समाजाचा अपमान राहुल गांधी यांनी केला आहे. याबद्दल राहुल गांधी यांना माफी मागावी लागणार आहे. पण ते माफी मागणार का? तसेच नाही न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा भोगणार की नाही? असा प्रश्नही बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेसला न्यायालयाचा निर्णयही मान्य नाही : राहुल गांधी यांनी न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करायला हवी. परंतु असे न होता, त्यांचे नेते रस्त्यावर आंदोलने करत संविधानाचा अपमान करत आहेत. राहुल गांधी यांच्यावर जी कारवाई झाली आहे, ती केंद्र सरकारच्या दबावाखाली झाली आहे असे काँग्रेस नेते आरोप करत आहे. हा न्यायालयाचा अपमान आहे, असेही बावनकुळे म्हणाले. सतत जातीयवादी वृत्तीमुळे ओबीसी समाजाला अपमानित करणाऱ्या काँग्रेसला आता न्यायालयाचा निर्णयही सुद्धा मान्य नाही, हे धक्कादायक असल्याचेही बावनकुळे म्हणाले आहेत.

हेही वाचा : Sharad Pawar On EVM : ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यास मत नेहमीच भाजपला जाते, विरोधकांनी 'हे' उपस्थित केले प्रश्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.