ETV Bharat / state

Kasba by election : कसबा पोटनिवडणुकीसाठी प्रचाराला सुरूवात; घटकपक्षांसह टिळक कुटुंबीय गैरहजर, चर्चांना उधाण - माझी विकास कामे घेऊन लोकांपुढे जाणार

कसबा पोट निवडणुकीसाठी भाजप, महविकास आघाडीसह विविध पक्ष संघटना तसेच अपक्ष उमेदवारांनी कंबर कसरी आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांनी आपल्या प्रचाराला सुरवात केली. पण त्याला

Kasba by election
कसबा पोटनिवडणूक
author img

By

Published : Feb 8, 2023, 2:47 PM IST

कसबा पोटनिवडणूक

पुणे : कसबा पोट निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. कसबा पोट निवडणुकीसाठी भाजप, महविकास आघाडी सह विविध पक्ष संघटना तसेच अपक्ष उमेदवारांनी कंबर कसरी आहे. सर्व मिळून तब्बल 39 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. या निवडणुकीसाठी आज अर्जाची छाननी होणार आहे. त्यांनतर किती उमेदवार रिंगणात उतरणार आहे. हे स्पष्ट होणार आहे. असे असले तरी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांनी आपल्या प्रचाराला सुरवात केली आहे. पण प्रचाराच्या सुरवातीलाच नाराज टिळक कुटुंबीयांसह घटक पक्षाचे नेते मंडळी गैरहजर असल्याचे दिसून आले.

महायुतीची महारॅली : आज भारतीय जनता पार्टीची महायुतीची महारॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत 50 लोक सहभागी झाले होते. तर या रॅलीसाठी भाजप सोबतचे बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) , शिवसंग्राम , आरपीआय (आठवले गट) यांनी या रॅलीला दांडी मारली. म्हणून अवघ्या 50 लोकांच्या उपस्थित भाजपने आपल्या प्रचाराची रॅली काढली. या रॅलीची सुरवात मिठगंज पोलीस चौकी येथून झाली. त्यानंतर मोमिन पुरा, चांदतारा चौक, गफूर ताकिया (सरळ)-दणकट मारुती मंडळ , निळू फुले तलाव- सिंहगड चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

विकास कामांवर लोकांपुढे जाणार : गेल्या पंधरा वर्षापासून महापालिकेत काम करत आहे. कामे करत असताना कसबा मतदारसंघात विकास काम असतील तसेच इलेक्ट्रिक बस असतील अशी अनेक कामे मी केली आहे. याच विकासाच्या मुद्द्यांवर जनतेसमोर जाणार आहे. विरोधकांनी जरी माझ्यावर टीका केली, तरी मी माझे विकास काम घेऊन लोकांपुढे जाणार असल्याचे यावेळी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी सांगितले.

टिळक म्हणतात धक्कादायक : रोहित टिळक यांनी आधीच नाराजी व्यक्त केली आहे. पक्षश्रेष्ठींनी मला पोटनिवडणुकीबद्दल विचारले होते. पण मी अलिप्त राहिलो. आज देशभरात ब्राह्मण समाजाच्यावतीने भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला जात आहे. पण आपण पुण्यातील आठही मतदारसंघ बघितले तर कोणत्याही ब्राह्मण समाजाला उमेदवारी दिलेली नाही. तसेच कसबा निवडणुकीबाबत जेव्हा उमेदवार जाहीर झाला, तेव्हा असे वाटले होते की आमच्याच कुटुंबातील लोकांना उमेदवारी दिली जाईल. पण हेमंत रासने यांना जेव्हा उमेदवारी देण्यात आली. तेव्हा तो निर्णय खूपच धक्कादायक होता. ब्राह्मण समाजामध्ये याबद्दल नाराजी असून ती मतदानाच्या माध्यमातून बाहेर येईल. असे रोहित टिळक यांनी सांगितले होते.

हेही वाचा : Stealing Donkey : चोरट्यांना आता गाढवेही पुरेना, १२ गाढवांची चोरी ८५ हजार किमतीच्या गाढवाचाही समावेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.