ETV Bharat / state

Savarkar Issue : सावरकरांच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक, उद्धव ठाकरेंची संयमी भूमिका - Freedom Savarkar

उद्धव ठाकरे यांचा सावरकरांच्या मुद्द्यावर कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केला आहे. राज्यात महाविकास आघाडीत फूट पाडण्यात भाजपला यश आल्याने त्यांनी उद्धव ठाकरेंंना घेरण्याची रणनीती ठरवली आहे. काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी खासदारकी गेल्यानंतर माफी मागायला मी काय सावरकर आहे का? असे म्हटले होते. त्यावरुन उद्धव ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान खपवून घेतला जाणार नसल्याचे म्हटले होते.

Savarkar
Savarkar
author img

By

Published : Mar 31, 2023, 7:59 PM IST

Updated : Mar 31, 2023, 10:29 PM IST

मंगल प्रभात लोढा

मुंबई : सावरकरांच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा भाजपने पवित्रा घेतला आहे. एकीकडे राहुल गांधी यांच्यावरून काँग्रेस भाजपवर आक्रमक होत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीत फूट पाडण्यासाठी भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवरून उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने निशाणा साधत आहे.

काँग्रेस, उद्धव ठाकरे गटात फूट : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यामध्ये विशेष करून उद्धव ठाकरे गटात फूट पाडण्यात भाजपला यश आले. त्यानंतर राज्यात शिंदे - फडणवीस सरकार स्थापन झाले. परंतु आता ज्या पद्धतीने महाविकास आघाडी पुन्हा एकत्रितपणे विरोधकांची भूमिका ठामपणे बजावत असताना त्याचा धसका कुठेतरी शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. यामध्ये फूट पाडण्यासाठी आता भाजप पूर्णतः प्रयत्नशील होताना दिसून येत आहे. त्यासाठी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. सावरकरांबद्दल काँग्रेसची भूमिका, राहुल गांधी यांच्याकडून सतत होणारी टीका यावरून हा आयता मुद्दा हाती घेऊन शिंदे-फडवणीस सरकार महाविकास आघाडीत विशेष करून काँग्रेस, उद्धव ठाकरे गटात फूट पाडण्यासाठी पुन्हा प्रयत्नशील झाली आहे.

भाजपचा डिवचण्याचा वारंवार प्रयत्न : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काँग्रेसची भूमिका नेहमीच विरोधाची राहिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने स्वतंत्र्यवीर सावरकर यांचा अपमानच करत आलेले आहेत. तसे पाहता राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतरसुद्धा ते सावरकरांच्या बाबतीत असलेल्या भूमिकेवर ठाम आहेत. हाच मुद्दा पकडून भाजपने उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा वारंवार प्रयत्न केला. परंतु या मुद्द्यावर बोलताना, भाजपला सत्तेतून पायाउतार करण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी प्रयत्न करीत आहे. या पक्षांमध्ये जरी प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी असली तरी, सुद्धाभाजप विरोधात हे तिन्ही पक्ष एक असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीही अनेकदा सांगितले आहे. आताही ते तेच सांगत आहेत.

महाविकास आघाडीत फूट? : राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत, माफी मागण्यासाठी मी काही सावरकर नाही, असे सांगून त्यांनी पुन्हा हा कळीचा मुद्दा निर्माण केला होता. परंतु त्यांच्या वक्तव्यानंतरसुद्धा उद्धव ठाकरे शांत राहिले. त्यांनी त्यास त्यांची भूमिका सांगत सावरकरांचा अपमान सहन केला जाणार नाही, हेसुद्धा ठणकावून सांगितले होते. परंतु मोदी विरोधामध्ये आम्ही सर्व एकत्र आहोत. ते सांगायलाही ते विसरले नाहीत. म्हणूनच भाजपसुद्धा वारंवार प्रयत्न करूनही महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पाडण्यास अपयशी ठरताना दिसत आहेत. भाजप सावरकरांच्या मुद्द्यावरून वारंवार उध्दव ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत.

उद्धव ठाकरे यांची संयमी भूमिका : आता दुसरीकडे भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने गौरव यात्रा राज्यभर सुरू केली आहे. सावरकरांबाबत आपले प्रेम दर्शवून देण्याचा त्यांनी नवीन प्रयत्न सुरू केला आहे. विशेष म्हणजे काँग्रेस सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांची अहवेलना करत असताना त्यावर चुप्पी साधून बसलेला उद्धव ठाकरे गट, काँग्रेस यांच्यामध्ये फूट पडण्यास अपयशी होत आहे. याच मुद्यावरुन भाजपने सावरकरांच्या नावाने गौरव यात्रा आयोजित केली असून दुसरीकडे सावरकरांचे भव्य थीम पार्क उभारण्याचा निर्णय सुद्धा घेतला गेला आहे.

भगूरमध्ये भव्य थीम पार्क : सावरकरांची जन्मभूमी नाशिक येथील भगूरमध्ये भव्य थीम पार्क, संग्रहालय बांधण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत हे थीम पार्क बांधले जाणार असून या ठिकाणी विविध कार्यक्रम सुद्धा साजरे केले जाणार आहेत. एकंदरीत भाजप इतक्या सहजरित्या हा मुद्दा शांत होऊ देत नसली तरी सावरकरांच्या बाबतीत उध्दव ठाकरे यांनी संयमी भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा - Security Devotees Clash in Shirdi : साई संस्थानचे सुरक्षारक्षक आणि भाविक एकमेकांना भिडले

Last Updated : Mar 31, 2023, 10:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.