ETV Bharat / state

मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचा जोरदार प्रचार - mawal Loksabha constituency

बाईक रॅली, पदयात्रा तसेच मतदारांच्या घरोघरी जाऊन वैयक्तिक भेटीगाठींवर भर देण्यात येत आहे. सार्वजनिक वाचनालये, चहाचे स्टॉल्स तसेच उद्यानेदेखील पिंजून काढली जात आहेत. बाईक रॅलीला तरुणांचाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे

मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचा प्रचार
author img

By

Published : Apr 27, 2019, 8:16 PM IST

खारघर (नवी मुंबई) - राज्यातील चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे काही तास उरले आहेत. म्हणूनच भाजप-शिवसेना महायुतीने प्रचाराचा जोर लावला आहे. मावळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी खारघरकरांची मने जिंकण्यासाठी त्यांच्या घरोघरी जाऊन बाईक रॅली, प्रचारफेऱ्या काढण्यात येत आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवाराला जोरदार टक्कर देण्यासाठी महायुतीने प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचा प्रचार

बाईक रॅली, पदयात्रा तसेच मतदारांच्या घरोघरी जाऊन वैयक्तिक भेटीगाठींवर भर देण्यात येत आहे. सार्वजनिक वाचनालये, चहाचे स्टॉल्स तसेच उद्यानेदेखील पिंजून काढली जात आहेत. बाईक रॅलीला तरुणांचाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. घाटकोपरमधील झोपडपट्टय़ा, मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांच्या घरी जाऊन तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाऊन प्रचार करण्यात येत आहे. विकासकामांसाठी महायुतीच्याच उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन करण्यात येत आहे.

मतदारसंघात भाजप आमदार प्रशांत ठाकूर आणि नगरसेवकांची विकासकामे प्रचंड आहेत. पाण्याची समस्या, डोंगराळ भाग, कचऱ्यांचे प्रश्न या मतदारसंघात अनेक वर्षांपासून आहे. दरम्यान, येथील जनतेला विकासकामेच हवी आहेत. केवळ वाचाळ बडबड न करता रेल्वेचा तसेच पाणी आणि कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावणाऱ्यांच्याच पाठीशी आपण उभे राहू, असे प्रत्येक मतदार सांगत आहेत.

आजच्या बाईक रॅलीमध्ये तरुणाईचा अधिक उत्साह दिसून आला. त्यामुळे महायुतीचाच खासदार दिल्लीत जाणार याबाबत आता कुणाच्या मनात शंका राहिलेली नाही, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला.

Intro:बातमीला व्हिडीओ व्हॉट्सऍप वर पाठवत आहे.

खारघर

राज्यातील चौथ्या टप्प्यातील निवडणूकीच्या प्रचारासाठी अवघे काही तास उरले आहेत. म्हणूनच भाजप-शिवसेना महायुतीने प्रचाराचा जोर लावलाय. मावळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी खारघरकरांची मने जिंकण्यासाठी त्यांच्या घरोघरी जाऊन बाईक रॅली, प्रचारफेऱ्या काढण्यात येत आहेत. अशाप्रकारे प्रतिस्पर्धी उमेदवाराला जोरदार टक्कर देण्यासाठी महायुतीने प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे.Body:बाईक रॅली, पदयात्रा तसेच मतदारांच्या घरोघरी जाऊन वैयक्तिक भेटीगाठींवर भर देण्यात येत आहे. सार्वजनिक वाचनालये, चहाचे स्टॉल्स व उद्यानेदेखील पिंजून काढली जात आहेत. बाईक रॅलीला तरुणांचाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. घाटकोपरमधील झोपडपट्टय़ा, मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांच्या घरी जाऊन तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाऊन प्रचार करण्यात येत आहे. विकासकामांसाठी महायुतीच्याच उमेदवाराला निवडून द्या असे आवाहन करण्यात येत आहे. कार्यकर्त्यांनी श्रीरंग बारणे आगे बढो हम तुम्हारे साथ है, महायुतीचा विजय असो अशा घोषणा दिल्या.Conclusion:
या मतदारसंघात भाजप आमदार प्रशांत ठाकूर आणि नगरसेवकांची विकासकामे प्रचंड आहेत. पाण्याची समस्या, डोंगराळ भाग कचऱ्याचा प्रश्न या मतदारसंघात अनेक वर्षांपासूनचा आहे. हे प्रश्न मार्गी लावण्यात भाजपचा हातखंडा आहे.दरम्यान, येथील जनतेला विकासकामेच हवी आहेत. या विकासकामांनाच मतदार मत देणार आहेत. केवळ वाचाळ बडबड न करता रेल्वेचा तसेच पाण्याचा आणि कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावणाऱ्यांच्याच पाठीशी आपण उभे राहू असे सांगताना प्रत्येक मतदार दिसत आहे.

आजच्या बाईक रॅलीमध्ये तरुणाईचा उत्साह पाहिला की पुन्हा महायुतीचाच खासदार दिल्लीत जाणार याबाबत आता कुणाच्या मनात शंका राहिलेली नाही, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.