मुंबई - भाजप आणि शिवसेना युतीच्या जागा वाटपाच्या संदर्भात मातोश्री उद्धव ठाकरे यांच्या घरी ५ तास मॅरेथॉन बैठक पार पडली. मात्र, या बैठकीनंतरही अद्याप युतीच्या जागा वाटपाचा गुंता कायम राहिला आहे. मंगळवारी मातोश्रीवर शिवसेना नेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, खासदार विनायक राऊत, शिवसेना सचिव अनिल देसाई बैठकीसाठी उपस्थित होते.
हेही वाचा - ..राहिलेल्यांची उमेदवारी पवार जाहीर करतील; बापटांचा अजित पवारांवर टोला
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह युतीमध्ये समन्वयकाची भूमिका बजावणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले नीरज गुंडे यांनी मंगळवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर जागा वाटपाच्या चर्चेला वेग आला होता. मंगळवारी किंवा बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जागा वाटपासंबंधी बोलणी होऊ शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - आज आर आर पाटील असते तर? राष्ट्रवादीला जाणवतेय आबांची उणीव
शिवसेनेची मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, युतीचा निर्णय लवकरच होईल. थोडी वाट पाहा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील. शिवसेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत यांनी युती कधी होईल? यावर भाजपला विचारा असे सांगत पाच तासांची मॅरेथॉन बैठक संपल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरात लवकर कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे डोळे लागले आहे.
हेही वाचा - ...अन् उदयनराजे यांना रडू कोसळले