ETV Bharat / state

Mumbai Crime News : स्टंटबाज दुचाकीस्वार निघाला सराईत गुन्हेगार, घरातून पोलिसांनी केली अटक

author img

By

Published : Apr 3, 2023, 7:47 AM IST

Updated : Apr 3, 2023, 8:04 AM IST

मुंबईच्या रस्त्यावर धोकादायक स्टंट करत असताना दोन मुलींना बाईकवरून घेऊन जाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तर या दुचाकीस्वाराला रविवारी अटक करण्यात आले आहे. व्हिडिओतील दोन मुलींचा शोध पोलीस घेत आहेत.

stunt biker arrested
बाइकवर जीवघेणा स्टंट

मुंबई : धोकादायक स्टंट करण्याचे प्रमाण वाढत आहे. दोन महिलांसोबत केलेल्या धोकादायक बाईक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, मुंबई पोलीसांनी कडक कारवाई केली आहे. दोन महिलांनी केलेल्या धोकादायक बाईक स्टंटचा तेरा सेकंदाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, मुंबई पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. वाहतुकीचे नियम मोडून वाहन चालवणारा स्टंटबाजला बीकेसी पोलीसांनी अटक केली. आरोपीचे नाव फैय्याज अहमद आजीमुल्ला कादरी (२४) असे आहे.

बाईकस्वारावर गुन्हा दाखल: ३० मार्चला पोथोलवॉरीअर्स या संस्थेने व्टिटर या सोशल मिडीया अ‍ॅपवर एक व्हिडीओ प्रसारीत केला होता. त्यामध्ये बीकेसी परिसरात बांद्रा कुर्ला वाहिनीवर एक बाईकस्वार दोन युवतींना मोटारसायकलवर बसवुन रस्त्याच्या कडेला लावलेल्या मानक चिन्हांकडे दुर्लक्ष करून, वाहतुकीचे नियमांचे पालन न करता विनाहेल्मेट एका चाकावर स्टंटबाजी करत भरधाव वेगाने मोटारसायकल चालवत होता. बीकेसी वाहतुक शाखेचे अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंड संविधान कलम ३०८, २७९, ३३६, ३४, ११४ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

  • #WATCH | Mumbai Police arrested a man namely Faiyaz Qadri, whose bike stunts with two women seated on his two-wheeler had gone viral. The accused was arrested by BKC police under whose jurisdiction the incident took place: Mumbai Police

    (Viral video, confirmed by Police) pic.twitter.com/CCRUPNOq4A

    — ANI (@ANI) April 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

#WATCH | Mumbai Police arrested a man namely Faiyaz Qadri, whose bike stunts with two women seated on his two-wheeler had gone viral. The accused was arrested by BKC police under whose jurisdiction the incident took place: Mumbai Police

(Viral video, confirmed by Police) pic.twitter.com/CCRUPNOq4A

— ANI (@ANI) April 2, 2023

सापळा लावून ताब्यात घेतले: गुन्हा दाखल करण्यात आल्यावर स्टंटबाजी करणाऱ्या आरोपीची माहिती मिळवली. टि. टी पोलीस ठाण्यात त्याच्यावर अगोदरपासून गुन्हा दाखल असलेला तो सराईत आरोपी आहे. आरोपीस अटक करण्यासाठी पोलीस पथकाला सुचना देण्यात आल्या आहे. आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याच्या राहत्या ठिकाणाचा ठावठिकाण वारंवार बदलत होता. तांत्रिक कौशल्याचे आधारे माहिती प्राप्त केली असता, आरोपी साकीनाका परिसरात असल्याचे पोलीस पथकास समजले. त्यावरून साकीनाका परिसरात पोलीस पथकाने सापळा लावून आरोपीस मोटारसायकलसह ताब्यात घेतले. आरोपीवर यापूर्वी तडीपारीची कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती परिमंडळ आठचे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.

बाईक स्टंट: व्हिडिओत, स्टंटमॅन रस्त्यावरील पुढची चाके उचलून अनेक मीटरपर्यंत गाडी चालवत होता. दुचाकीवर दोन महिलाही असल्याचे दिसून आले. तिघांनी हेल्मेट घातले नव्हते. मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: Bike Stunt Video मुंबईत रस्त्यावर स्टंटबाजी करणारा व्हिडिओ व्हायरल दोन महिलांसह एकाविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : धोकादायक स्टंट करण्याचे प्रमाण वाढत आहे. दोन महिलांसोबत केलेल्या धोकादायक बाईक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, मुंबई पोलीसांनी कडक कारवाई केली आहे. दोन महिलांनी केलेल्या धोकादायक बाईक स्टंटचा तेरा सेकंदाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, मुंबई पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. वाहतुकीचे नियम मोडून वाहन चालवणारा स्टंटबाजला बीकेसी पोलीसांनी अटक केली. आरोपीचे नाव फैय्याज अहमद आजीमुल्ला कादरी (२४) असे आहे.

बाईकस्वारावर गुन्हा दाखल: ३० मार्चला पोथोलवॉरीअर्स या संस्थेने व्टिटर या सोशल मिडीया अ‍ॅपवर एक व्हिडीओ प्रसारीत केला होता. त्यामध्ये बीकेसी परिसरात बांद्रा कुर्ला वाहिनीवर एक बाईकस्वार दोन युवतींना मोटारसायकलवर बसवुन रस्त्याच्या कडेला लावलेल्या मानक चिन्हांकडे दुर्लक्ष करून, वाहतुकीचे नियमांचे पालन न करता विनाहेल्मेट एका चाकावर स्टंटबाजी करत भरधाव वेगाने मोटारसायकल चालवत होता. बीकेसी वाहतुक शाखेचे अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंड संविधान कलम ३०८, २७९, ३३६, ३४, ११४ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

  • #WATCH | Mumbai Police arrested a man namely Faiyaz Qadri, whose bike stunts with two women seated on his two-wheeler had gone viral. The accused was arrested by BKC police under whose jurisdiction the incident took place: Mumbai Police

    (Viral video, confirmed by Police) pic.twitter.com/CCRUPNOq4A

    — ANI (@ANI) April 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सापळा लावून ताब्यात घेतले: गुन्हा दाखल करण्यात आल्यावर स्टंटबाजी करणाऱ्या आरोपीची माहिती मिळवली. टि. टी पोलीस ठाण्यात त्याच्यावर अगोदरपासून गुन्हा दाखल असलेला तो सराईत आरोपी आहे. आरोपीस अटक करण्यासाठी पोलीस पथकाला सुचना देण्यात आल्या आहे. आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याच्या राहत्या ठिकाणाचा ठावठिकाण वारंवार बदलत होता. तांत्रिक कौशल्याचे आधारे माहिती प्राप्त केली असता, आरोपी साकीनाका परिसरात असल्याचे पोलीस पथकास समजले. त्यावरून साकीनाका परिसरात पोलीस पथकाने सापळा लावून आरोपीस मोटारसायकलसह ताब्यात घेतले. आरोपीवर यापूर्वी तडीपारीची कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती परिमंडळ आठचे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.

बाईक स्टंट: व्हिडिओत, स्टंटमॅन रस्त्यावरील पुढची चाके उचलून अनेक मीटरपर्यंत गाडी चालवत होता. दुचाकीवर दोन महिलाही असल्याचे दिसून आले. तिघांनी हेल्मेट घातले नव्हते. मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: Bike Stunt Video मुंबईत रस्त्यावर स्टंटबाजी करणारा व्हिडिओ व्हायरल दोन महिलांसह एकाविरोधात गुन्हा दाखल

Last Updated : Apr 3, 2023, 8:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.