ETV Bharat / state

विक्रोळीत मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीला अटक - पोलीस

विक्रोळी विभागातून तीन होंडा डिओ मोटरसायकल चोरणाऱ्या टोळीला पोलीसांनी अटक केली आहे. टोळीतील पाच अट्टल चोरांना पकडण्यात पोलीसांना यश आले आहे.

stolen bike
stolen bike
author img

By

Published : Mar 23, 2021, 5:26 PM IST

मुंबई - कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमध्ये चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला होता. विक्रोळी विभागातून तीन होंडा डिओ या मोटरसायकल चोरीला गेल्याची तक्रार विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये दाखल होती. त्यामुळे विक्रोळी परिसरात चोरट्यांची चांगलीच दहशत माजली होती. आता या मोटरसायकल चोरट्यांच्या टोळीचा विक्रोळी पोलिसांनी शोध लावला आहे. या टोळीत एकूण ५ चोरट्यांना अटक करण्यात विक्रोळी पोलिसांना यश आले आहे.

मोटरसायकल चोरी करणारी टोळी अटक

हेही वाचा - सचिन वाझे प्रकरण : फॉरेन्सिकची टीम एनआयए कार्यालयात दाखल, जप्त व्होल्वो कारची तपासणी

विक्रोळी पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा चव्हाण यांनी या प्रकरणाविषयी चौकशी करण्याचे आदेश सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील यांना दिले. निलेश पाटील व त्यांची टीम पो.ह.सुभाष सोनवणे, पो.ना.वामन जायभाये, पो.ना.कैलास चवहाण ,पो.शि.महेश गाडेकर, पो.शि.निलेश ठाकूर आणि पो.शि.योगेश उडंरे यांनी या चोरट्यांचा शोध सुरू केला. विक्रोळी पोलिसांना ५ चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे. शाखीर शेख, खालिद खान,रेहान कुरेशी, अरबाज खान, इब्राहिम शेख असे या चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी ज्या ज्या चोरीस गेलेल्या तीन गाड्या ताब्यात घेतल्या आहेत व या ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - यूपीतला चोर, फक्त उन्हाळ्यात करायचा चोरी; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.