ETV Bharat / state

Nitish Kumar Met Sharad Pawar : लोकशाही वाचविण्यासाठी सोबत राहून काम करूया- शरद पवार

भाजपा सक्षमपणे विरोध करण्यासाठी देशातील भाजपा सोडून सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज नितीश कुमार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली. यावेळी संयुक्त पत्रकार परिषदेचे देखील आयोजन करण्यात आलं. देशातील सध्याची परिस्थिती पाहता लोकशाही वाचवण्यासाठी सोबत येऊन काम करणे गरजेचे असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Nitish Kumar Met Sharad Pawar
Nitish Kumar Met Sharad Pawar
author img

By

Published : May 11, 2023, 7:47 PM IST

नितीश कुमार शरद पवारांची पत्रकार परिषद

मुंबई : भाजपा सक्षमपणे विरोध करण्यासाठी देशातील भाजपा सोडून सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज नितीश कुमार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली. यावेळी संयुक्त पत्रकार परिषदेचे देखील आयोजन करण्यात आलं. देशातील सध्याची परिस्थिती पाहता लोकशाही वाचवण्यासाठी सोबत येऊन काम करणे गरजेचे असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

भाजपाला पर्याय निर्माण करू : आज नितीश कुमार आणि त्यांचे सहकारी भेटायला आले होतें. सध्या देशातली परिस्थिती पाहता, देशातील लोकशाही वाचवण्यासाठी , सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम गरजेचे आहे. त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. ते काम सध्या नितीश कुमार करत आहेत. परिस्थिती पाहता एक वेगळा पर्याय देशाला हवा आहे. कर्नाटक पोल मध्ये आपण पहिलं असेल तर भाजपला दूर करण्याचा प्रयत्न कर्नाटक मध्ये होतोय. अशीच परिस्थिती देशात निर्माण झाली आहे. आम्ही आता भाजपला रोखण्यासाठी प्रयत्न करत आहोत. अजची भेट ही त्याचाच एक भाग आहे. यापूर्वी

युपीएचे अध्यक्ष व्हावे : दिल्लीत आम्हीं अनेक नेते एकत्र आलो होतो. राहुल गांधी, खरगे सगळ्यांनी याच विषयावर चर्चा केली होती. आता सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. नितीश कुमार यांनी एक मिशन हातात घेतला आहे. त्यांनी देशातील अनेक विरोधी पक्षातील नेत्यांसोबत चर्चा केली आहे. त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांचे मी स्वागत करतो. आमचं त्यांना सहकार्य असल्याचे शरद पवारांनी म्हटले आहे. युपीएचे अध्यक्ष व्हावे हीच सर्वांची इच्छा.

देशातील विरोधी पक्ष एकत्र : आम्ही शरद पवारांची भेट घेतली आहे आणि आजच्या भेटी संदर्भात त्यांनी सर्व माहिती सांगितलेली आहे. सध्या देशामध्ये भाजप ज्या पद्धतीने काम करत आहे ते देशाच्या हितासाठी नाही. अशा परिस्थितीमध्ये सगळे देशातील विरोधी पक्ष एकत्र जर झाले ते देशाच्या हितासाठी चांगला असेल. यासंदर्भात आज चर्चा झाली आणि त्याच अनुषंगाने सध्या भेटीगाठी सुरू आहे. त्यासाठी सर्व एकत्र येऊन बसतील आणि त्यानंतर पुढील निर्णय घेणार. आजची चर्चा अतिशय चांगली.देशाच्या हितासाठी ही चांगली गोष्ट होत आहे. युपीएच्या अध्यक्ष वरून माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नितीश कुमार म्हणाले कि शरद पवार यांनी युपीएचे अध्यक्ष व्हावं हीच सर्वांची इच्छा आहे. आम्हाला तर याचा आनंद होईल.

पवारांची गरज : यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यावेळी देखील आम्ही त्यांना म्हणालो होतो, की आपण राजनांचा फेर विचार करावा, देशातील सत्ताधारी पक्षाच्या विरोधात तुमची खूप गरज आहे. त्यामुळे आपण राजीनामा मागे घ्यावा अशी त्यांना विनंती केली होती. सर्वांशी चांगली चर्चा होत आहे आणि त्यानंतर होणाऱ्या गटबंधनला एक नाव देखील दिले जाणार आहे. आणि त्यानंतर सर्व गोष्टी होणार आहे. यासाठी सर्वजण एकत्र येऊन एक मोठे बैठकीचा आयोजन केलं जाणार आहे.

बैठकीनंतर निर्णय : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जर देशात भाजपा विरोधी पक्षातील चेहरा झाला तर सर्वांना आनंद होईल. यासाठी सर्वांना पहिले एकत्र येऊ द्या असे देखील यावेळी सांगायला ते विसरले नाही. या बैठकीतील भाजप विरोधातील सर्व छोटे-मोठे पक्ष एकत्र येऊन आपली भूमिका मांडतील. बैठकीत चर्चा होईल त्यानंतर चेहऱ्यावरती एक मत होणार आहे.

  • हेही वाचा-
  1. CM DCM on SC Verdict : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; आम्ही समाधानी, नैतिकता आम्हाला शिकवू नका
  2. Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांसह निवडणूक आयोगाला फटकारले, शिंदे-फडणवीस सरकार वाचले!
  3. SC on Governor Floor Test Call : राज्यपालांचा फ्लोअर टेस्ट बोलावण्याचा निर्णय अवैध; सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.