मुंबई : माझी लोकसभा अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. वारदात त्यामुळे आजारी असलेल्या मनोहर जोशी यांना विस्मृतीचाही रोग जडला आहे. मात्र त्यांची बुद्धी अजूनही तल्लख असून राज्याच्या राजकारणामध्ये झालेल्या उलताबादची नंतरही ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत कायम राहिले शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील त्यांची आढळनिष्ठा त्यांना शिवसेनेपासून दूर करू शकली नाही.
शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेब ठाकरेंसोबत : शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटचे प्रिन्सिपल मनोहर जोशी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत उभे राहिले. शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या दादर विभागातून मनोहर जोशी यांनी विधानसभा आणि लोकसभेत नेतृत्व केल. बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी आणि सल्लागार म्हणून मनोहर जोशी यांच्याकडे पाहिले जाते. शिवसेनेमध्ये मनोहर जोशी यांच्या शब्दाला मान आणि आदर कायम मिळाला.
1995 मध्ये मुख्यमंत्री : राज्यात युतीची पहिल्यांदा सत्ता आल्यानंतर शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री पदासाठी कोण अशी चर्चा सुरू झाली वास्तविक प्रादेशिक पक्षांचे प्रमुख मुख्यमंत्रीपद स्वतःकडे घेतात अशी प्रथा असताना कोणतीही निवडणूक लढवणार नाही, अशी शपथ घेतलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली. पहिल्यांदाच एक बिगर काँग्रेसची नेता, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाला. मात्र असे असले तरी शपथविधीच्या आदल्या दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मी उठ म्हटल्यानंतर उठणारा आणि बस म्हटल्यानंतर बसणारा असायला हवा. मुख्यमंत्री कोणीही असलं तरी सत्तेचा रिमोट कंट्रोल माझ्याकडेच राहणार हे त्यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री पदावरून पाय उतार : 'मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्री म्हणून अतिशय चांगली कारकीर्द महाराष्ट्रात केली. उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत आणि भाजपासोबत जुळवून घेत बाळासाहेब ठाकरे यांची मर्जी सांभाळत त्यांनी चार वर्ष कारभार केला. मात्र, त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्याशी काही निर्णय मतभेद झाले. ते मनोहर जोशी यांना भोवले. शिवसेनेच्या खासदारांना एकत्र बांधून ठेवण्यात आणि पक्षासाठी योगदान देण्यात नेहमीच मार्गदर्शन मनोहर जोशी यांनी केले. मनोहर जोशी यांच्या काळात दैदिप्यमान कामगिरी जरी झाली नसली तरी मनोहर जोशी यांनी शिवसेनेच्या अजेंड्यानुसार त्यांच्यावर दिलेली जबाबदारी चोख पार पाडली, असेही भावसार यांनी सांगितले.
जोशी यांच्या एकूणच मुख्यमंत्री पदाला फटका बसला तो त्यांच्या जावयामुळे जावई गिरीश याला दिलेल्या एका भूखंडाच्या प्रकरणावरून जोशी यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले - विवेक भावसार, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक
लोकसभा अध्यक्ष होण्याचा मराठी माणसाला मान : संसदेत गेल्यानंतर पहिला मराठी लोकसभा अध्यक्ष होण्याचा मानही मनोहर जोशी यांना बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मिळाला. बाळासाहेब यांनी नेहमीच मनोहर जोशी यांच्यावर विश्वास टाकला. जोशी यांनीही आपल्या चोख कामगिरीने तो सार्थ ठरवला. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात मनोहर जोशी लोकसभा अध्यक्ष होते या काळात त्यांनी केंद्रात अतिशय चांगले काम केल्याचे ज्येष्ठ पत्रकार चंदन शिरवाले सांगतात.
उद्धव ठाकरेंकडून अपमान तरीही शिवसेनेतच : उतरत्या वयानुसार उद्धव ठाकरे यांच्यासोबत मनोहर जोशी यांचे खटके उडू लागले. जोशी यांच्या काही वादग्रस्त विधानांमुळे उद्धव ठाकरे हे नाराज झाले. त्यांनी जोशी यांना दुय्यम स्थान देण्यास सुरुवात केली. यामुळे व्यतीत झालेले मनोहर जोशी शिवसेनेच्या कार्यक्रमांमधून, व्यासपीठांवरून गायब झाले. मात्र इतके झाले असतानाही त्यांनी शिवसेना सोडली नाही. तितकेच काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशी यांची भेट घेऊन त्यांना आपल्या गटात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनोहर जोशी यांनी त्यालाही प्रतिसाद न देता शिवसेनेतच राहणे पसंत केले आहे. एकूणच बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांच्यातील अतूट प्रेमामुळेच ते शिवसेनेत असल्याचं भावसार सांगतात.
हेही वाचा: