मुंबई: मध्य रेल्वे 8 नोव्हेंबर 2022 ते 12 डिसेंबर 2022 पर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पायाभूत सुविधांचा ब्लॉक घेईल. त्यामुळे पुढील गाड्या प्रत्येक विरुद्ध नमूद केलेल्या तारखांपासून शॉर्ट टर्मिनस सोडल्या जातील. अर्थात त्या छत्रपती शिवाजी टर्मिनस तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस (Lokmanya Tilak Terminus) पर्यंत न येता पनवेल, ठाणे पर्यंत येतील. तेथूनच पुन्हा रवाना होतील. ह्या ट्रेनचे वेळापत्रक (Train Timetable) पुढील प्रमाणे असेल.
सर्व प्रवाशांनी या वेळापत्रकाची दखल घेत त्याप्रमाणे आपले नियोजन करण्याचे आवाहन मध्य रेल्वे महामंडळाने केलेले आहे.
16346 तिरुवनंतपुरम-LTT नेत्रावती एक्सप्रेस JCO 8 नोव्हेंबर 2022 ते 12 डिसेंबर 2022, पनवेल येथे अल्पावधीत थांबेल. 16345 LTT-तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस JCO 10 नोव्हेंबर 2022 ते 13 डिसेंबर 2022 रोजी पनवेलहून अल्पावधीत निघेल.
14314 बरेली-एलटीटी एक्सप्रेस JCO 12 नोव्हेंबर 2022, 19 नोव्हेंबर 2022, 26 नोव्हेंबर 2022, 3 डिसेंबर.2022, 10 डिसेंम्बर 2022 ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट होईल. 22512 कामाख्या-एलटीटी एक्सप्रेस JCO 12 डिसेंबर 2022, 19 नोव्हेंबर 2022, 26 नोव्हेंबर 2022, 3 डिसेंबर 2022, 10.12.2022 ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट होईल 22511 LTT-कामाख्या एक्स्प्रेस JCO 15 नोव्हेंबर2022, 22.नोव्हेंबर .2022, 29 नोव्हेंबर 2022, 6 डिसेंबर 2022 आणि
13 डिसेंम्बर 2022 ठाण्याहून रवाना होईल. अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए के सिंग यांनी सांगितली.