ETV Bharat / state

...अन् भानुशाली इमारतीचा भाग पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसराजवळ फोर्ट भागात एका इमारतीचा भाग कोसळला. या इमारतीमध्ये रहिवासी राहत असून अनेक रहिवासी मलब्याखाली अडकले असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी अग्निशमनदलाच्या जवानांकडून शोधकार्य सुरू केले आहे.

author img

By

Published : Jul 16, 2020, 7:33 PM IST

भानुशाली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली

मुंबई - सीएसटी येथील जीपीओ समोरील भानुशाली इमारतीचा अर्धा भाग आज सायंकाळी पत्त्यासारखा कोसळला. या इमारतीमध्ये रहिवासी राहत असून अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, घटनास्थळी मुंबई अग्निशमन दल आणि मुंबई पोलीस दाखल झाले असून या इमारतीचा मलबा हटविण्याचे काम सुरू आहे. तर, इमारत धोकादायक असल्याने ही इमारत खाली करुन पाडली जाणार आहे.

आज सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास फोर्ट परिसरातील गोवा स्ट्रीटवरील लकी हाऊसजवळील कबुतर खाना येथील भानुशाली इमारतीचा अर्धा भाग कोसळला. तळ अधिक चार, अशी पाच मजली ही इमारत आहे. इमारत कोसळण्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून मलबा हटवला जात आहे. या इमारतीमध्ये रहिवासी राहत असून अनेक रहिवासी मलब्याखाली अडकले असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी अग्निशमनदलाच्या जवानांकडून शोधकार्य सुरू केले आहे. मलबा हटवून त्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक रहिवासीही पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना मदत करत आहेत. दरम्यान, इमारतीच्या ढिगाऱ्याखालून काही रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार ही इमारत मोडकळीस आली असल्याने इमारत खाली करून ती पाडली जाणार आहे. ही इमारत सी 1 म्हणजे अतिधोकादायक असल्याची माहिती मिळत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.