ETV Bharat / state

Bhima Koregaon Case : भीमा कोरेगाव प्रकरण; आरोपी वकील सुरेंद्र गडलिंगांची डिफॉल्ट जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव - Bhima Koregaon Case Accused

भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणातील (Bhima Koregaon Case) आरोपी वकील सुरेंद्र गडलिंग (Accused lawyer Surendra Gadling) यांनी मुंबई उच्च न्यायालयात डिफॉल्ट जामीनाकरिता धाव घेतली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाने डिफॉल्ट जामीन फेटाळल्यानंतर सत्र न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात (Moves High Court For Default Bail) आले आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी येण्याची विनंती उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.

Bhima Koregaon Case
सुरेंद्र गडलिंग
author img

By

Published : Jan 4, 2023, 7:45 PM IST

मुंबई : भीमा कोरेगाव प्रकरणी (Bhima Koregaon Case) आरोपी सुरेंद्र गडलिंग (Accused lawyer Surendra Gadling) हे गेल्या चार वर्षांपासून जेलमध्ये आहेत. यापूर्वी त्यांनी मुंबई सत्र न्यायालयातील यांना हे विशेष न्यायालयात डिफॉल्ट जामीन तसेच रेगुलर जामीन विशेष न्यायालयाकडून फेटाळण्यात आला होता. या प्रकरणात सुधा भारद्वाज, वरावरा राव आणि हनी बाबू यांना वैद्यकीय कारणामुळे जामीन मिळाला आहे. इतर आरोपींना अद्याप न्यायालयाकडून जामीन मिळालेला नाही. यामुळे आरोपी सुरेंद्र गडलिंग यांनी डिफॉल्ट जामीन फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात धाव (Moves High Court For Default Bail) घेतली.

भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी : भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कार्यकर्ते रोना विल्सन, नागपूरस्थित वकील सुरेंद्र गडलिंग, नागपूर विद्यापीठाच्या प्राध्यापक शोमा सेन, महेश राऊत, रिपब्लिकन पँथर्सचे सुधीर ढवळे, वकील कार्यकर्ते सुधा भारद्वाज, तेलुगू कवी पी वरवरा राव, कार्यकर्ते अरुण फरेरा आणि वेरनॉन गोन्साल्विस आहेत. मृत स्टेन स्वामी, गौतम नवलखा, प्राध्यापक हनी बाबू, सागर गोरखा, रमेश गायचोर, ज्योती जगताप व फरार आरोपी मिलिंद तेलतुंबडे यांचा समावेश आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणात अटक : सुधा भारद्वाज यांच्यावर शहरी नक्षली असल्याचा ठपका ठेवत पुणे पोलिसांनी त्यांना भीमा कोरेगाव हिंसाचार एलगार परिषद प्रकरणात 6 जून 2018 ला अटक केली. त्यांच्यासह अन्य काही वकील, लेखक आणि मानवी हक्क कार्यकर्त्यांनाही अटक करण्यात आली होती. पुणे पोलीस या प्रकरणाची चौकशी करण्यात उशीर करत आहेत. त्यामुळे त्यांच्या एकूण कार्यपद्धतीवरच अनेक प्रश्नं उपस्थित होत होते.

काय आहे भीमा कोरेगाव प्रकरण? : पेशव्यांचं मराठा सैन्य आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या युद्धाच्या 200व्या स्मृतिदिनानिमित्त 31 डिसेंबर 2017 रोजी भीमा कोरेगांव शौर्य दिवस प्रेरणा अभियान या कार्यक्रमाअंतर्गत अनेक दलित संघटनांनी एकत्रितपणे एका रॅलीचे आयोजन केलं होतं. या युद्धात पेशव्यांविरोधात ईस्ट इंडिया कंपनीबरोबर महार रेजिमेंट लढली होती आणि यात बहुतांश दलित सैनिक होते. पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी दंगल झाली होती आणि त्या दिवशी इथे लाखोंच्या संख्येने दलित समुदाय जमा होतो. या घटनेचे पडसाद देशभर उमटले होते. या हिंसाचाराला एक दिवस अगोदर म्हणजे 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदे तील वक्तव्यं कारणीभूत होती अशा तक्रारीवरून पुणे पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू केला. या एल्गार परिषदे मागे माओवादी संघटनांचा हात होता असं म्हणत या संघटनांशी कथित संबंध आहेत या संशयावरून पुणे पोलिसांनी देशभरातल्या विविध भागांतून डाव्या चळवळीशी संबंधित अनेकांना अटक केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.