मुंबई - महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी एका महिलेचा हात पिरगळलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे. याचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत असताना महिलांचा अवमान करणाऱ्या महापौरांचे तोंड काळे करू, असा इशारा भीम आर्मीचे अध्यक्ष अशोक कांबळे यांनी दिला आहे. यासंबंधीत एक व्हिडिओ भीम आर्मीने प्रसारित केला आहे.
महापौर जिथे असतील तिथे महापौराचे तोंड काळे करा. त्यांना चपलाचा हार घालावा, असे आवाहन कांबळे यांनी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना आणि मुंबईकरांना या व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.
"या महिला मनसेच्या होत्या. त्यांनी हाताची साखळी करून आम्हाला अंत्यदर्शन करण्यासाठी रोखले. तेव्हा हात बाजूला करून आम्ही तिथे गेलो. मी हात मुरगळलाच नाही. आम्ही असे कोणतेही चुकीचे काम केले नाही" असे स्पष्टीकरण महापौरांनी दिले आहे.