ETV Bharat / state

'मुख्यमंत्र्यांना महापुरुषांचा विसर', कार्यकर्त्यांनी व्यक्त केली नाराजी

शिवाजी पार्कपासून केवळ काही पावलांच्या अंतरावर 'चैत्यभूमी' आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या समाधीस्थळाला ठाकरे यांनी अभिवादन न केल्याने भीम आर्मी संघटनेचे अध्यक्ष अशोक कांबळे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

भीम आर्मीचे कार्यकर्ते
भीम आर्मीचे कार्यकर्ते
author img

By

Published : Nov 28, 2019, 11:45 PM IST

Updated : Nov 29, 2019, 12:23 AM IST

मुंबई - महाविकासआघाडीचे मुख्यमंत्री म्हणून आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे मोठ्या दिमाखात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, या शपथविधीदरम्यान त्यांना महापुरुषांचा विसर पडल्याचा आरोप करत फुले-शाहू-आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - रायगड संवर्धनासाठी २० कोटी निधी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय

शिवाजी पार्कपासून केवळ काही पावलांच्या अंतरावर 'चैत्यभूमी' आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या समाधीस्थळाला ठाकरे यांनी अभिवादन न केल्याने भीम आर्मी संघटनेचे अध्यक्ष अशोक कांबळे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा - नव्या सरकारच्या सहा मंत्र्यांनी घेतली शपथ; अशी आहे नवनिर्वाचीत मंत्र्यांची राजकीय कारकीर्द

'आज महात्मा फुले यांचा स्मृतिदिन आहे. त्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांना महात्मा फुलेंसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करता आले असते. त्यातच त्यांनी शपथ घेतानाही या दोन महापुरुषांचा साधा उल्लेखही केला नाही. शिवाय जवळच असलेल्या चैत्यभूमीकडे न जाता त्याहून दूर असलेल्या सिद्धिविनायक मंदिराकडे गेले आणि तेथे सिद्धीविनायकाचं त्यांनी दर्शन घेतले', अशी टीका करत ठाकरेंना महापुरुषांचा विसर पडल्याचे कांबळे म्हणाले.

Intro:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पडला महापुरुषांचा विसर; कार्यकर्ते नाराज

mh-mum-01-cm-udhhav-mahapurush-121-7201153

मुंबई, ता. 28 :

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे मोठ्या दिमाखात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र या शपथेनंतर त्यांना महापुरुषांचा विसर पडल्याने राज्यातील फुले-शाहू-आंबेडकर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

शिवाजी पार्क पासून केवळ काही पावलांच्या अंतरावर भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधीस्थळ असलेले चैत्यभूमी हे प्रसिद्ध स्थळ आहे. या समाधी स्थळाला त्यांना अभिवादन केले नसल्याने या भीम आर्मी संघटनेचे अध्यक्ष अशोक कांबळे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली

आज महात्मा फुले यांचा स्मृतिदिन ही होता त्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांना आपल्या आजोबांचा वारसा सांगत महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करता आले असते. त्यातच त्यांनी शपथ घेताना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचा साधा उल्लेख केला नाही. शिवाय जवळच असलेल्या चैत्यभूमीकडे ते न जाता त्याहून दूर असलेल्या सिद्धिविनायक मंदिराकडे गेले आणि तेथे सिद्धीविनायकाचं त्यांनी दर्शन घेतलं त्यानंतरही ते चैत्यभूमी वर येऊन अभिवादन केले असते तर राज्यातील तमाम फुले-शाहू-आंबेडकर विचारांच्या कार्यकर्त्यांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक आनंदाचे वातावरण निर्माण झालं असतं. परंतु त्यांना महापुरुषांच्या विचारांचा विसर पडला असल्याची प्रतिक्रिया अशोक कांबळे यांनी दिली.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी ठाकरे यांनी बाजूलाच असलेल्या चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन करावे, अशा प्रकारचे अपेक्षा केली होती परंतु त्यानंतर त्यांनी ते टाळले असल्याने त्यांच्याबद्दलचा त्यांचा आदर कमी झाला असल्याचेही कांबळे यांनी सांगत त्याविषयी खंत व्यक्त केली.

Body:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पडला महापुरुषांचा विसर; कार्यकर्ते नाराज

mh-mum-01-cm-udhhav-mahapurush-121-7201153

मुंबई, ता. 28 :

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे मोठ्या दिमाखात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र या शपथेनंतर त्यांना महापुरुषांचा विसर पडल्याने राज्यातील फुले-शाहू-आंबेडकर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

शिवाजी पार्क पासून केवळ काही पावलांच्या अंतरावर भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधीस्थळ असलेले चैत्यभूमी हे प्रसिद्ध स्थळ आहे. या समाधी स्थळाला त्यांना अभिवादन केले नसल्याने या भीम आर्मी संघटनेचे अध्यक्ष अशोक कांबळे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली

आज महात्मा फुले यांचा स्मृतिदिन ही होता. त्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांना आपल्या आजोबांचा वारसा सांगत महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करता आले असते. त्यातच त्यांनी शपथ घेताना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचा साधा उल्लेख केला नाही. शिवाय जवळच असलेल्या चैत्यभूमीकडे ते न जाता त्याहून दूर असलेल्या सिद्धिविनायक मंदिराकडे गेले आणि तेथे सिद्धीविनायकाचं त्यांनी दर्शन घेतलं त्यानंतरही ते चैत्यभूमी वर येऊन अभिवादन केले असते तर राज्यातील तमाम फुले-शाहू-आंबेडकर विचारांच्या कार्यकर्त्यांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक आनंदाचे वातावरण निर्माण झालं असतं. परंतु त्यांना महापुरुषांच्या विचारांचा विसर पडला असल्याची प्रतिक्रिया अशोक कांबळे यांनी दिली.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी ठाकरे यांनी बाजूलाच असलेल्या चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन करावे, अशा प्रकारचे अपेक्षा केली होती परंतु त्यानंतर त्यांनी ते टाळले असल्याने त्यांच्याबद्दलचा त्यांचा आदर कमी झाला असल्याचेही कांबळे यांनी सांगत त्याविषयी खंत व्यक्त केली.

Conclusion:
Last Updated : Nov 29, 2019, 12:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.