ETV Bharat / state

Corona:कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने भाटिया रुग्णालय सील तर हिंदुजाचा आयसीयू बंद

author img

By

Published : Apr 9, 2020, 10:39 AM IST

भाटिया रुग्णालयात तीन रुग्ण इतर उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात हे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 70 कर्मचाऱ्यांची कोरोनाबाबत तपासणी केली जात आहे.

bhatia hospital sealed because corona patient admitted in hospital
Corona:कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने भाटिया रुग्णालय सील तर हिंदुजाचा आयसीयू बंद

मुंबई - रुग्णालयात कोरोना विषाणूवर उपचार करण्याची सुविधा नसतानाही रुग्णाला दाखल करणे भाटिया रुग्णालयाला महागात पडले आहे. या रुग्णालयातील तीन रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याने रुग्णालय पालिकेने तात्पुरते बंद केले आहे. तर हिंदुजा रुग्णालयातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आयसीयू विभाग बंद करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेच्या डी विभाग कार्यालयाच्या हद्दीत ताडदेव येथे भाटिया रुग्णालयात आहे. या रुग्णालयात तीन रुग्ण इतर उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात हे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 70 कर्मचाऱ्यांची कोरोनाबाबत तपासणी केली जात आहे. तोपर्यंत तातपुरत्या स्वरूपात हे रुग्णालय बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आहे.

हिंदुजा रुग्णालयाचा आयसीयू बंद -

खार येथे सुप्रसिद्ध असे हिंदुजा रुग्णालय आहे. या रुग्णालयात एक व्यक्ती न्यूरॉलॉजीच्या त्रासामुळे भरती झाला होता. त्या रुग्णाला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. त्याची कोरोनाची टेस्ट केली असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पालिकेला याची माहिती देण्यात आली. रुग्णाला जास्त त्रास नसल्याने त्याला सेव्हन हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुरक्षेचा उपाय म्हणून पालिकेने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली आहे. रुग्णालयातील आयसीयू विभाग बंद करण्यात आला असून ओपीडी आणि अत्यावश्यक रुग्ण विभाग सुरू ठेवण्यात आला आहे. पालिकेकडून पुढील आदेश येईपर्यंत आयसीयूमध्ये कोणालाही दाखल केले जाणार नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.