मुंबई - राज्यात कोरोनामुळे बाधित होणाऱ्यांची संख्या घटत आहे. मात्र, तरीही कोरोनाची भीती कायम आहे. कारण 'जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही' हे डोक्यात ठेवून वागावे लागत आहे. त्यामुळे सगळ्यांचे डोळे लागले आहेत ते कोरोना लशीकडे. अशात आणखी एक सकारात्मक बातमी आहे. ती म्हणजे आता मुंबईत ऑक्सफर्डच्या कोरोना लशीनंतर दुसऱ्या एका कोरोना लशीची मानवी चाचणी करण्यात येणार आहे. ही लस भारतीय असून हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनीची ही लस आहे. या कंपनीने लशीच्या मानवी चाचणीसाठी मुंबईतील नामांकित सायन रुग्णालयाची निवड केली आहे. त्यानुसार दिवाळीनंतर या चाचणीला सुरुवात होणार असून हजार स्वयंसेवकांना लस टोचवण्यात येणार असल्याची माहिती सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महानगर पालिका यांनी दिली आहे.
भारतीय लशीची चाचणी घेणारे पहिले रुग्णालय
कोरोनाला हरवण्यासाठी लशीशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. त्यामुळे जगभरातील देश आणि शास्त्रज्ञ लस तयार करण्याच्या मागे लागले आहेत. जगात आज 8 हुन अधिक लशीवर काम सुरू आहे. तर या कामात भारतही आघाडीवर आहे. ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लशीची मानवी चाचणी देशात सुरू असून आता भारतीय बनावटीच्या पहिल्या कोरोना लशीची चाचणी सुरू होणार असून ही तमाम भारतीयासाठी आनंदाची बाब आहे. ऑक्सफर्डच्या लशीच्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटचा सहभाग आहे. पण, भारत बायोटेक ही भारतीय कंपनी असून त्यांची लस ही पूर्णतः भारतीय बनावटीची आहे हे विशेष. तेव्हा या भारतीय लशीची चाचणी आता सायन रुग्णालयात होणार असून भारतीय लशीची चाचणी घेणारे सायन रुग्णालय हे पहिले रुग्णालय आहे. तेव्हा सायन रुग्णालयाला हा मान, ही संधी मिळाली असून ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याची प्रतिक्रिया काकाणी यांनी दिली आहे.
हजार स्वयंसेवकांसाठी लवकरच जाहिरात
आयसीएमआरकडून सायन रुग्णालयाची भारत बायोटेककडून तयार करण्यात येत असलेल्या लशीची चाचणी करण्यासाठी निवड झाली आहे. तर आता आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मानवी चाचणी सुरू करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सायनमध्ये हजार स्वयंसेवकांना लस टोचवण्यात येणार आहे. नर्स, डॉक्टर आणि सर्वसामान्य अशा सगळ्यांचा समावेश यात असणार आहे. पण, ज्यांना कोरोना झाला नसेल, ज्यांच्यात कोरोनाच्या अँटिबॉडीज तयार झाल्या नसतील, ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यासारखे आजार नसतील अशांचाच समावेश यात असणार आहे, असेही काकाणी यांनी सांगितले आहे. दरम्यान, या हजार स्वयंसेवकांच्या निवडीसाठी लवकरच जाहिरात अर्थात वृत्तपत्रात निवेदन प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर नियमात बसतील अशाची निवड करत त्यांना लस देण्यात येणार आहे असेही ते म्हणाले.
केईएम आणि नायरमधील चाचणी तिसऱ्या टप्प्यात
सायनमध्ये दिवाळीनंतर भारतीय कोरोना लशीच्या चाचणीला सुरुवात होणार आहे. तर दुसरीकडे ऑक्सफर्ड आणि सिरमच्या लशीच्या मानवी चाचणीच्या प्रक्रियेनेही आता वेग घेतला आहे. केईएममध्ये 100 तर नायरमध्ये 148 जणांना लस टोचवण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये या दोन्ही रुग्णालयात चाचणीला सुरुवात झाली आहे. तर आता या 248 स्वयंसेवकांना दुसरा बूस्टर डोस देण्यात आला असून ते सद्या तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आहेत असेही त्यांनी सांगितले आहे.
सर्व 248 स्वयंसेवक ठणठणीत
कोणत्याही लशीची मानवी चाचणी हे मोठे आव्हान असते. कारण या चाचणी स्वयंसेवक दगावण्याची वा त्याच्या शरीरावर काही विपरीत परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे लशीची मानवी चाचणी बारीक लक्ष देत करावी लागते. दरम्यान, कोरोना लशीच्या मानवी चाचणी दरम्यान काही देशात काही स्वयंसेवकांना त्रास झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत कोरोना लशीच्या मानवी चाचणीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत धाकधूक राहणार आहे. पण असे असले तरी आतापर्यंत सुदैवाने केईएम आणि नायरमध्ये अशी कोणतीही अडचण आलेली नाही आणि येऊ नये. आतापर्यंत सर्व 248 स्वयंसेवक ठणठणीत असून डॉक्टर त्यांची उत्तम काळजी घेत असल्याचेही काकाणी यांनी सांगितले आहे.
दिवाळीनंतर सायन रुग्णालयात देशी कोरोना लशीच्या मानवी चाचणीला सुरुवात; हजार स्वयंसेवकांवर होणार प्रयोग - सायन रुग्णालयात कोरोना लशीची मानवी चाचणी
मुंबईत ऑक्सफर्डच्या कोरोना लशीनंतर दुसऱ्या एका कोरोना लशीची मानवी चाचणी करण्यात येणार आहे. लस भारतीय असून हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनीची ही लस आहे. या कंपनीने लशीच्या मानवी चाचणीसाठी मुंबईतील नामांकित सायन रुग्णालयाची निवड केली आहे.