ETV Bharat / state

Bhandardara Varsha Mahotsav : आदिवासी बोहाडा नृत्याने वर्षा महोत्सवाची सांगता - Tribal Warli painting

भंडारदरा या निसर्गरम्य ठिकाणी गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या वर्षा पर्यटन महोत्सवाची बुधवारी आदिवासी बोहाडा नृत्याने सांगता (Bhandardara Varsha Mahotsav) झाली. या पाच दिवसांमध्ये पर्यटकांनी निसर्गरम्य परिसराच्या भेटी सोबतच आदिवासी पारंपारिक लोककलांचा आस्वाद घेतला. त्यामुळे हा पर्यटन महोत्सव यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया पर्यटन संचालक डॉ. बी. एन पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Bhandardara Varsha Mahotsav
बोहाडा नृत्याने वर्षा महोत्सवाची सांगता
author img

By

Published : Aug 17, 2023, 8:42 PM IST

बोहाडा नृत्याने वर्षा महोत्सवाची सांगता

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा, घाटघर या निसर्गरम्य भागात राज्याच्या पर्यटन विभागातर्फे गेल्या पाच दिवसांपासून वर्षा पर्यटन महोत्सवाचे आयोजन (Bhandardara Varsha Mahotsav) करण्यात आले होते. पहिल्या दोन दिवशी स्थानिक कलाकारांच्या आदिवासी नृत्यासह (tribal Bohada dance) बांबू पेंटिंग, आदिवासी वारली चित्रकला (Tribal Warli painting) या कार्यशाळेला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच, परराज्यातील उद्योगपती आणि पर्यटकांनी लावलेली हजेरी जमेची बाजू होती. यावेळी या पर्यटकांनी नैसर्गिक सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला. यासोबतच आदिवासी लोककलांनी मंत्रमुग्ध झालेले व्यावसायिक या भागात पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पर्यटन सहसंचालक सुशील पवार यांनी दिली.

बोहाडा नृत्यावर थिरकले पर्यटक : पर्यटन महोत्सवाच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसूबाईच्या ट्रेकचाही पर्यटकांनी आनंद लुटला. निसर्गरम्य धुक्याच्या पावसाळी वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या ट्रेकने पर्यटन महोत्सवात उपस्थितांचा आनंद द्विगुणित झाला. पर्यटन महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी घाटघर, कोकणकडा येथे महिलांनी बोहाडा नावाचे आदिवासी नृत्य सादर केले. या नृत्याविष्काला पर्यटकांनी जोरदार प्रतिसाद दिला.

देशभक्तीपर गाण्यांवर झुंबा डान्स : अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आर्नी सायकलिंग ग्रुप यवतमाळ यांच्यातर्फे देशभक्तीपर गीतांवर आधारित कार्यक्रम तसेच झुंबा डान्सला पर्यटकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. भंडारदरा शेंडी, घाटघर या परिसरात गेल्या पाच दिवसांपासून अनेक उपक्रम पर्यटन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आले. स्थानिक आदिवासी बांधव तसेच पर्यटकांनी मोठ्या उत्साहाने या पर्यटन महोत्सवात सहभागी होऊन या महोत्सवाची शोभा वाढवली. भंडारदरा वर्षा महोत्सवाची बुधवारी पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक सुशील पवार यांच्या उपस्थितीत सांगता करण्यात आली.

हेही वाचा -

Bhandardara Varsha Mahotsav : परराज्यातील व्यावसायिकांचा भंडारदरा महोत्सवाला उदंड प्रतिसाद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.