ETV Bharat / state

Betel Nut Smuggling : 32 कोटींच्या सुपारी तस्करीचा कट डीआरआयनं उधळला, आजपर्यंतची देशातील सर्वात मोठी कारवाई

DRI ने JNPT येथे कॅल्शियम नायट्रेटच्या स्वरूपात 32 कोटी रुपये किमतीचे अरेका नट्स (सुपारी) जप्त केलीय. या कंनटेरनमध्ये 32.31 कोटी रुपये किमतीचे सुपारी आढळून आली होती. अरेका नट्स (सुपारी) जप्तीची आत्तापर्यंतची ही देशातील सर्वात मोठी घटना आहे.

Betel Nut Smuggling
Betel Nut Smuggling
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2023, 9:15 PM IST

मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयानं(DRI) सुपारी तस्करीच्या प्रयत्नाचा पर्दाफाश केला आहे. जेएनपीटी बंदरावर ही कारवाई करण्यात आली आहे. सुपारी जप्ती संदर्भात केलेली ही देशातील सर्वात मोठी कारवाई आहे. सीमा शुल्क वाचवण्यासाठी बनवलेल्या बिलासह वाहतुकीच्या कागदपत्रात नमूद केलेली माहिती खोटी आढळून आली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर, 31 ऑगस्टला जवाहरलाल नेहरू बंदरावर डीआरआय मुंबईनं आयसीडी तळेगावसाठी निर्यात होणारे 14 कंटेनरमध्ये सुपारी असल्याच्या संशयावरून अडवले आहेत. हे कंटेनर जेएनपीटी बंदरावर थांबवण्यात आले आहेत.

14 कंटेनरमध्ये 32.31 कोटींची सुपारी : इंपोर्ट मॅनिफेस्टच्या तपशिलानुसार, बिल ऑफ लेडिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार कंटेनरमध्ये 'कॅल्शियम नायट्रेट' होतं. तथापि, तपासणीत ही माहिती चुकीची मांडण्यात आल्याचं चौकशीतून निष्पन्न झालं होतं. सर्व 14 कंटेनरमध्ये सुपारी होती, जी कॅल्शियम नायट्रेटच्या नावाखाली भारतात आयात केली जात होती.

32 कोटींच्या सुपारी तस्करीचा कट
32 कोटींच्या सुपारी तस्करीचा कट

32.31 कोटी रुपयाची सुपारी जप्त : सरकारनं बाहेरून देशात आणलेल्या सुपारींवर सुमारे 10 हजार 379/- USD प्रति मेट्रिक टन टॅरिफ मूल्य ठेवलं आहे. त्यामुळे, 32.31 कोटी रुपये (अंदाजे) किमतीची 3 लाख 71 हजार 90 किलो (371MT) सुपारी जप्त करण्यात आली आहे. DRI मुंबईनं, गुप्त माहितीच्या आधारे, 31 ऑगस्ट रोजी जवाहरलाल नेहरू बंदरावर ICD तळेगावकडं जाणारे 14 कंटेनर अडवले होते. DRI मुंबईनं14 कंटेनर मुंबईच्या जेएनपीटी बंदरावर थांबवले होते. या कंटेनरमधील सुपारी दलालामार्फत दुसरीकडं नेण्याची शक्याता असल्यानं जेएनपीटी बंदरावरच रोखून ठेवण्यात आले होते. या कंटेनरमधील माल इतर मार्गानं नेण्याची शक्याता DRI मुंबईनं व्यक्त केली होती. महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) ₹ 4.43 कोटी किमतीच्या बेकायदेशीर सुपारी तस्करीमध्ये सहभागी असलेल्या दोन गुन्हेगारी नेटवर्कचा पर्दाफाश केला होता होता. तसंच या प्रकरणी पाच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 50 मेट्रिक टन तस्करी केलेली सुपारी त्यावेळी जप्त करण्यात आली होती.

हेही वाचा -

  1. Eight Crores Gold Seized : अबब...! मुंबईहून तस्करी होणारे आठ कोटी रुपयांचं सोनं जप्त, दोन तस्करांची चौकशी सुरू
  2. Beed Molestation News: अल्पवयीन मुलाने केला मालकाच्याच 3 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल
  3. Nanded Crime News : परभणीतील बालकाची नांदेडमध्ये हत्या; दोरीने हातपाय बांधून फेकले तलावात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.