ETV Bharat / state

बेस्ट उपोषण : शशांक राव यांची प्रकृती खालावली, केईएम रुग्णालयात केले दाखल - बेस्ट प्रशासन

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कृती समितीच्या नेतृत्वाखाली गेले 3 दिवस वडाळा डेपोबाहेर उपोषण सुरू आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे शशांक राव यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पालिकेच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शशांक राव
author img

By

Published : Aug 30, 2019, 1:59 AM IST

मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कृती समितीच्या नेतृत्वाखाली गेले 3 दिवस वडाळा डेपोबाहेर उपोषण सुरू आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे शशांक राव यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पालिकेच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शशांक राव यांची प्रकृती खालावली

वेतन करार, पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे सानुग्रह अनुदान अशा विविध मागण्या बेस्ट प्रशासन, पालिका आयुक्त, राज्य सरकार दरबारी प्रलंबित आहेत. त्यासाठी संप करायचा का? याबाबत 23 ऑगस्टला विविध बस आगाराबाहेर कामगारांनी मतदान केले. 98 टक्के कामगारांनी संपाच्या बाजूने मतदान केले. तरीही बेस्ट उपक्रमाला 1 संधी द्यावी, म्हणून धरणे आंदोलन करण्यात आले होते. यात शिवसेनेच्या कामगार संघटनेकडून 27 ऑगस्टला वेतन करार करू असे सांगण्यात आले. परंतु त्यादिवशी करार न झाल्याने कृती समितीकडून बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले.

या आंदोलनादरम्यान शिवसेनेने उद्धव ठाकरे व महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या उपस्थितीत पालिका आयुक्त आणि बेस्ट महाव्यवस्थापक यांच्याशी बैठक घेऊन चर्चा केली. या बैठकीत 2 दिवसात वेतन करार करून सातवा वेतन आयोग लागू करू असे सांगण्यात आले. त्यानंतर बुधवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत सातवा वेतन आयोग तत्वता लागू करण्यास प्रशासनाने मान्यता दिल्याचे सांगण्यात आले. यानंतर बेस्ट महाव्यवस्थापक आणि शशांक राव यांच्यात बैठक झाली. या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याने 3 दिवस उपोषण सुरु होते. यातच गुरुवारी राव यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना केईएम रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Intro:मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कृती समितीच्या नेतृत्वाखाली गेले तीन दिवस वडाळा डेपोबाहेर उपोषण सुरु आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे शशांक राव यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पालिकेच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. Body:वेतन करार, पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे सानुग्रह अनुदान अशा विविध मागण्या बेस्ट प्रशासन, पालिका आयुक्त, राज्य सरकार दरबारी प्रलंबित आहेत. त्यासाठी संप करायचा का याबाबत २३ ऑगस्टला विविध बस आगाराबाहेर कामगारांनी मतदान केले. ९८ टक्के कामगारांनी संपाच्या बाजूने मतदान केले. तरीही बेस्ट उपक्रमाला एक संधी द्यावी म्हणून धरणे आंदोलन करण्यात आले होते. शिवसेनेच्या कामगार संघटनेकडून २७ ऑगस्टला वेतन करार करू असे सांगण्यात आले. त्यादिवशी करार न झाल्याने कृती समितीकडून बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले.

या आंदोलनादरम्यान शिवसेनेने उद्धव ठाकरे व महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या उपस्थितीत पालिका आयुक्त आणि बेस्ट महाव्यवस्थापक यांच्याशी बैठक घेऊन चर्चा केली. या बैठकीत दोन दिवसात वेतन करार करून सातवा वेतन आयोग लागू करू असे सांगण्यात आले. त्यानंतर बुधवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत सातवा वेतन आयोग तत्वता लागू करण्यास प्रशासनाने मान्यता दिल्याचे सांगण्यात आले. यानंतर बेस्ट महाव्यवस्थापक आणि शशांक राव यांच्यात बैठक झाली. या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याने तीन दिवस उपोषण सुरु होते. आज राव यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना केईएम रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सोबत - visConclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.