ETV Bharat / state

मुंबई : माटुंग्यात धावत्या बेस्ट बसला आग, सुदैवाने टळली जीवीतहानी - प्रवाशी

27 क्रमांकाच्या बसला आग लागली असून ही बस मुलुंड ते वरळी मार्गावर धावते.

माटुंगा माहेश्वरी उद्यान येथे बेस्ट बसला आग
author img

By

Published : Jul 31, 2019, 5:21 PM IST

Updated : Jul 31, 2019, 6:05 PM IST

मुंबई - मुंबईत धावत्या बसला आग लागण्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. मे महिन्यात गोरेगाव येथे लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा माटुंगा येथील महेश्वरी उद्यान येथे धावत्या बसला आग लागली आहे. बसला आग लागताच प्रवाशी वेळीच बाहेर पडल्याने कोणीही जखमी झाले नाही.

माटुंग्यात धावत्या बेस्ट बसला आग

मुलुंडच्या वैशाली नगर ते वरळी डेपो या मार्गावर बस मार्ग क्रमांक 27 चालवली जाते. ही बस माटुंगा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर माहेश्वरी उद्यान येथे दुपारी 4.15 च्या सुमारास आली. त्यावेळी बसच्या इंजिनमधून धूर येऊ लागला. त्यावेळी चालकाने प्रसंगावधान राखत प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. त्यावेळी बसने पेट घेतला. चालकाने बसमधील अग्निरोधक यंत्रणेद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने मुंबई अग्निशमन दलाला बोलावण्यात आले.

अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत जळालेली बस डिझेलवर चालणारी होती. याआधीही बेस्टच्या बसमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, त्या बस सीएनजीवर चालणाऱ्या होत्या. मात्र, आता डिझेलवर चालणाऱ्या बसलाही आग लागल्याने बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वर्षभरातच बसला आग -

पालिकेने मागीलवर्षी बेस्टला 100 कोटी रुपये अनुदान दिले होते. त्यामधून 90 कोटी रुपयांचा वापर करून बेस्टने डिझेलवर चालणाऱ्या 185 बसगाड्या टाटा कंपनीकडून विकत घेतल्या होत्या. त्यामधील ही एक बस होती. या बसची किंम्मत 55 लाख आहे. वर्षभरातच आग लागल्याने आता या बसच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, यापूर्वी दिंडोशीजवळील गोकुळधाम येथे 3 मे रोजी सकाळी हाय प्रेशर गेजचा स्फोट झाल्यानेच बेस्टच्या बस मार्ग क्र. 646 ला आग लागली होती. बेस्ट प्रशासनाकडून याबाबतचा अहवाल पाठवण्यात आला असून, आगीमुळे बेस्टचे 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

Intro:फ्लॅश
*माटुंगा माहेश्वरी उद्यान येथे बेस्टच्या बसला आग*
- 27 क्रमांकाची बस
मुलुंड ते वरळी मार्गावर चालते बस
- ड्रायव्हरच्या केबिनला आग
- प्रवाशी बाहेर पडल्याने कोणीही जखमी नाही
- Body:FlashConclusion:null
Last Updated : Jul 31, 2019, 6:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.