मुंबई : चॅट जीपीटी या सॉफ्टवेअरमुळे सहज आणि अचूक माहिती उपलब्ध होत आहे. या सॉफ्टवेअरमुळे सर्वच क्षेत्रातील लोकांना फायदा होत आहे. शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होत आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर परिणाम होणार आहे, अशी माहिती जेटकिंग इन्फोट्रेनचे सीईओ आणि एमडी, हर्ष भारवानी यांनी दिली.
शिक्षणामध्ये चॅट जीपीटीचे फायदे : शिक्षणाच्या बाबतीत चॅट जीपीटीमुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची झटपट उत्तरे मिळ मिळू शकतात. त्यांची कार्यक्षमता वाढून वेळेची बचत होणार आहे. हे तंत्रज्ञान शिक्षणात विद्यार्थ्यांना जटिल प्रश्न सोप्या पद्धतीने समजून घेण्यास मदत करणार आहे. शाळा महाविद्यालये काही काळापुरती शिक्षण देतात. चॅट जीपीटी २४ तास उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना शाळेच्या तसेच वेळेच्या पलीकडे जाऊन माहिती मिळवण्यास मदत होणार आहे. चॅट जीटीपी विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेच्या कौशल्यांचा सराव करण्यात मदत करू शकते. तसेच भाषा सुधारू शकते असे हर्ष भारवानी यांनी संगितले.
शिक्षणामध्ये चॅट जीपीटीचे तोटे : चॅट जीपीटीचे जसे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. विद्यार्थ्याच्या प्रश्नाचे सर्वसमावेशक किंवा अचूक उत्तर देण्यासाठी चॅट जीपीटीकडे पुरेसा संदर्भ नसू शकतो. याव्यतिरिक्त उत्तराला कोणता संदर्भ आहे यांचा आधार प्रदान करण्याची क्षमता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तर समजुन घेतांना पडताळणी करणयाची गरज आहे. तंत्रज्ञानावरील जास्त प्रमाणात अवलंबून रहाणे ही एक चिंतेची बाब आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वतः समस्या सोडवण्याच्या क्षमतेमध्ये परिणाम होऊन विचार करण्याची, उपाय शोधण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
विद्यार्थी, व्यावसायिकांचे भविष्य कसे असेल : विद्यार्थी तसेच व्यावसायिक भविष्यात त्यांच्या जीवनात, करिअरमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर कसा करतात यावर अवलंबून आहे. चॅट जीपीटीमध्ये माहिती, सहाय्य त्वरित उपलब्ध करून देण्याची क्षमता आहे. हे तंत्रज्ञान कामाच्या ठिकाणी प्रश्नांची जलद उत्तरे देऊ शकते. तंत्रज्ञान जसजसे पुढे जाईल तशा काही नोकर्या स्वयंचलित होऊ शकतात. तर, एआय, मशीन लर्निंग सारख्या क्षेत्रात नवीन नोकर्या उदयास येऊ शकतात असे भारवानी यांनी संगितले.
काय आहे चॅट-जीपीटी : आतापर्यंत कोणतीही माहिती हवी असल्यास इंटरनेटवर गुगलचा वापर सर्च इंजिन म्हणून वापरले जात आहे. मात्र, गेल्या काही काळात आपल्याला हव्या असलेल्या प्रश्नाची उत्तरे देणारी कृत्रिम बुद्धी म्हणून चॅट जीपीटीचा अविष्कार झाला आहे. चॅटबॉट प्रणालीच्या स्वरूपातील डिजिटल तंत्रज्ञानातील प्रगतीचा हा नवा टप्पा मनाला जातो. चॅट जीपीटीचा वापर सध्या सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात केला जात आहे.