ETV Bharat / state

सरकार बनवायचे आहे, तयार राहा; बाळासाहेब थोरातांच्या काँग्रेस आमदारांना सूचना - महाराष्ट्र सरकार स्थापना

विधान भवन येथे शुक्रवारी काँग्रेसच्या विधिमंडळ नेत्याच्या निवडी संदर्भात आमदारांची मुख्य बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपल्या आमदारांना राज्यात आपण लवकरच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत मिळून सरकार स्थापन करणार असल्याची माहिती दिली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात
author img

By

Published : Nov 22, 2019, 5:04 PM IST

Updated : Nov 22, 2019, 6:09 PM IST

मुंबई - आपले शिवसेनेसोबतच सरकार बनवण्याचे ठरले आहे. जो अंतिम निर्णय होईल तो लवकरच कळवला जाईल. त्यासाठी सर्व आमदारांनी तयार राहावे, अशा सूचना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या आमदारांना दिल्या आहेत. विधान भवन येथे शुक्रवारी काँग्रेसच्या विधिमंडळ नेत्याच्या निवडी संदर्भात आमदारांची मुख्य बैठक झाली. या बैठकीत थोरात यांनी आपल्या आमदारांना राज्यात आपण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत मिळून सरकार स्थापन करणार असल्याची माहिती दिली.

लवकरच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत मिळून सरकार स्थापन करणार

राज्यपालांना देण्यात येणाऱ्या निवेदनासाठी आमदारांच्या सह्यांची गरज पडेल, ही बाब लक्षात घेऊन काँग्रेसने सर्व आमदारांच्या सह्यांचे निवेदन तयार केले असल्याची माहिती काँग्रेसच्या एका आमदारांनी दिली. या बैठकीत आम्ही आमदारांच्या सह्या या केवळ उपस्थिती मोजण्यासाठी घेतल्या असल्याचा दावा थोरातांनी माध्यमांशी बोलताना केला.

हेही वाचा - पुणे महापालिकेच्या महापौरपदी मुरलीधर मोहोळ यांची बहुमताने निवड

काँग्रेसचे सर्व कार्याध्यक्ष, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि सर्व प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते.

आमदारांची ही बैठक विधिमंडळ नेता निवडीबाबत होती मात्र, विधिमंडळ नेता निवडीचे सर्व अधिकार हायकमांडला देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यामुळे हायकमांडकडून विधिमंडळ नेता निवडीचा निर्णय येत्या दोन दिवसात येईल.

Intro:सरकार बनवायचे आहे, तयार राहा ! बाळासाहेब थोरात यांनी दिलेले काँग्रेस आमदारांना आदेश

mh-mum-01-cong-bl-thorat-byte-7201153

मुंबई, ता. २२ :
शिवसेनेसोबत आपल्याला कोणत्या स्थितीत सरकार बनवण्याचे ठरले आहे त्यामुळे जो निर्णय होईल तो लवकरच कळवला जाईल मात्र त्यासाठी सर्व आमदारांनी तयार राहावे असे आदेश आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपल्या आमदारांना दिले.
विधान भवन येथे आज काँग्रेसच्या विधिमंडळ नेत्याच्या निवडणूक संदर्भात आमदारांची मुख्य बैठक झाली.या बैठकीत थोरात यांनी आपल्या आमदारांना राज्यात आपण शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सरकार बनवत असल्याची माहिती देतो त्यासाठी सर्वांनी तयार राहावे असा आदेश दिले त्यासोबतच ऐनवेळी राज्यपालांना देण्यात येणाऱ्या नियोजनासाठी आमदारांच्या सह्यांची गरज पडेल ही बाब लक्षात घेऊन काँग्रेसकडून आज सर्व आमदारांच्या सह्यांचे निवेदन तयार करण्यात आले असल्याची माहिती काँग्रेसच्या एका आमदारांनी सांगितले.
आमदारांच्या बैठकीत काँग्रेसचे सर्व कार्याध्यक्ष त्यांच्यासोबतच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण माणिकराव ठाकरे आणि सर्व प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीत विधिमंडळ नेता निवड करणे हा प्रमुख मुद्दा होता. मात्र हा नेता निवडी ऐवजी त्यासाठीचे सर्वाधिकार हायकमांडला देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला त्यामुळे हायकमांड कडून विधिमंडळ नेता निवडीचा निर्णय येत्या दोन दिवसात घेतला जाणार आहे.
दरम्यान, थोरात यांनी या बैठकीत आम्ही आमदारांच्या सह्या या केवळ उपस्थिती मोजण्यासाठी घेतल्या असल्याचा दावा माध्यमांशी बोलताना केला. आमच्या चर्चा सुरू असून लवकरच निर्णय सांगितला जाईल असेही थोरात म्हणाले.

Body:सरकार बनवायचे आहे, तयार राहा ! बाळासाहेब थोरात यांनी दिलेले काँग्रेस आमदारांना आदेश
Conclusion:
Last Updated : Nov 22, 2019, 6:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.