ETV Bharat / state

सावधान..! बाजारात बनावट सॅनिटायझरचा सुळसुळाट

author img

By

Published : Aug 17, 2020, 7:07 PM IST

कोरोना काळात सॅनिटायझरची मागणी वाढली आहे. तर या मागणीचा फायदा घेत अनेक उत्पादक बनावट किंवा अप्रमाणित सॅनिटायझर बाजारात आणत आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईतून ही बाब समोर आली आहे. एफडीएने तपासणी केलेल्या सॅनिटायझरच्या 16 नमुन्याच्या अहवालापैकी तब्बल 8 नमुने अप्रमाणित आढळले आहेत.

Be careful Sale of counterfeit hand sanitizers in the market
सावधान..! बाजारात बनावट सॅनिटायझर्सचा सुळसुळाट

मुंबई - कोरोनापासून बचाव करण्यासाठी सध्या मास्क आणि सॅनिटायझर हे महत्वाचे शस्त्र आहेत. त्यामुळे सद्या सॅनिटायझरची मागणी वाढली आहे. तर या मागणीचा फायदा घेत अनेक उत्पादक बनावट किंवा अप्रमाणित सॅनिटायझर बाजारात आणत आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईतून ही बाब समोर आली आहे. एफडीएने तपासणी केलेल्या सॅनिटायझरच्या 16 नमुन्याच्या अहवालापैकी तब्बल 8 नमुने अप्रमाणित आढळले आहेत. या बनावट सॅनिटायझरचा वापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे सॅनिटायझरची खरेदी करताना योग्य ती काळजी घ्या, असे आवाहन एफडीएने केले आहे.

सॅनिटायझरने हातावरील व वस्तूवरील कोरोनाचे विषाणू नष्ट करतात. त्यामुळे आता सॅनिटायझर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. सॅनिटायझरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी एफडीएने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यातील 110 कारखान्याना सॅनिटायझर उत्पादनासाठी परवानगी दिली. या आधी राज्यात 142 कंपन्या सॅनिटायझरचे उत्पादन करत होत्या. पण मार्चपासून सॅनिटायझरची मागणी प्रचंड वाढल्याने 110 कारखान्यानीही उत्पादन सुरू केले आहे. तर आता सुमारे 252 कंपन्या व कारखाने सॅनिटायझरचे उत्पादन करत आहेत. त्यामुळे सॅनिटायझरचा मुबलक साठा राज्यात आहे. मात्र त्याच वेळी काही उत्पादक परिस्थितीचा फायदा घेत बनावट सॅनिटायझरची राजरोसपणे बाजारात विक्री करत आहेत.

सॅनिटायझरची मागणी वाढल्यापासून बनावट सॅनिटायझरची विक्री केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारीनुसार एफडीएने एप्रिलपासून या विरोधात कारवाई सुरू केल्याची माहिती जुगल किशोर मंत्री, सहआयुक्त (औषध) मुख्यालय यांनी दिली आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात मुंबईसह राज्यभरातून सॅनिटायझरचे नमुने घेतले आहेत. त्यापैकी 16 नमुन्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. 16 पैकी निम्मे म्हणजेच 8 नमुने अप्रमाणित आढळल्याची माहिती मंत्री यांनी दिली आहे. मागील तीन महिन्यातील काही नमुन्यांचा तपासणी अहवाल येणे बाकी आहे. तर जुलै-ऑगस्टमध्येही नमुने घेतले असून ते ही तपासणीसाठी पाठवले आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे.

8 पैकी 7 उत्पादक बाहेरच्या राज्यातील -
ज्या उत्पादकांच्या 8 नमुन्यांचे अहवाल अप्रमाणित आले आहेत. त्या उत्पादकाविरोधात पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. या उत्पादकाविरोधात खटले दाखल करण्यात येत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे 8 पैकी 7 उत्पादक हे परराज्यातील आहेत. म्हणजेच महाराष्ट्राबाहेर बनावट सॅनिटायझरची निर्मिती मोठ्या संख्येने होते असे यातून स्पष्ट होत आहे. तेव्हा बाहेरून येणाऱ्या सॅनिटायझरवरही लक्ष ठेवण्याचे आव्हान एफडीए समोर आता उभे ठाकले आहे.

बिल घेऊनच सॅनिटायझर खरेदी करा
बाजारात मोठ्या प्रमाणात बनावट सॅनिटायझर विक्रीसाठी ठेवले जात आहेत. मात्र सर्वसामान्यांसाठी बनावट सॅनिटायझर ओळखता येणे सोपे नाही. तसे ओळखताही येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी अधिकृत मेडिकलमधूनच सॅनिटायझर खरेदी करावे. तर खरेदी बिल न चुकता घ्यावे. कारण बिल म्हणजेच सॅनिटायझर बनावट नाही याचा मोठा पुरावा आहे. बनावट सॅनिटायझर असल्यास कुणी ही खरेदी बिल देत नाही. तेव्हा बिल घ्यावे, असे आवाहन मंत्री यांनी केले आहे.

मिथेनॉलयुक्त सॅनिटायझर ठरू शकते घातक
नियमाप्रमाणे सॅनिटायझरमध्ये इथेनॉलच असावे लागते. तर त्याचे प्रमाणही ठरलेले आहे. इथेनॉल प्रमाणापेक्षा कमी वा जास्त ही नको. असे झाल्यास ते विषाणू मारण्यासाठी उपयोगी ठरत नाही. त्यातही महत्वाचे म्हणजे इथेनॉलऐवजी मिथेनॉलचाही वापर बनावट सॅनिटायझरमध्ये होतो. हे अधिक घातक ठरते. कारण मिथेनॉल हे औद्योगिक वापरासाठी असते. अशावेळी मिथेनॉल तोंडात गेले वा डोळ्यात गेले तर ते शरीरास घातक ठरते. डोळे जाण्याची ही भीती मोठी असते असेही मंत्री सांगतात. त्यामुळे सॅनिटायझरची खरेदी काळजीपूर्वक करणे गरजेचे ठरते.

एफडीएच्या दुर्लक्षामुळे बनावट सॅनिटायझरचा बाजार
बनावट सॅनिटायझरविरोधात एफडीएकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई होताना दिसत नाही. थोडे थोडके नमुने शोधले जातात. तर त्यांची तापसणी करत अहवाल वेळेत सादर केले जात नाहीत. तसेच बनावट सॅनिटायझर तयार करणाऱ्याविरोधात कडक कारवाई होत नाही. त्यामुळेच बनावट सॅनिटायझर बनविणाऱ्याचे फावते आहे, असा आरोप या निमित्ताने ऑल फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी केला आहे. तर आता तरी एफडीएने अशा लोकांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी ही त्यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.