मुंबई- विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी आज देशव्यापी संप पुकारला आहे. त्यासाठी हजारो कर्मचारी केंद्र सरकारच्या बँक धोरणांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. या कर्मचाऱ्यांनी हरीमन सर्कल ते आझाद मैदान असा मोर्चा काढला आहे.
हेही वाचा- निर्भया प्रकरण : दोषी अक्षयचे क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले
काही वेळात आझाद मैदान येथे सभा होणार आहे. दरम्यान, आज (शुक्रवार)पासून हा संप आहे. यामुळे बँकांचे व्यवहार विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील कर्मचाऱ्यांचे वेतन सुधारणा नोव्हेंबर २०१७ पासून प्रलंबित असल्याच्या निषेधार्थ हा दोन दिवस संप होणार आहे.