ETV Bharat / state

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : मुंबईत बँक ऑफ महाराष्ट्र बाहेरची गर्दी झाली कमी - bank of maharashtra

घाटकोपरच्या पंतनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्र बाहेर ग्राहकांनी रांगा लावल्याची बातमी ‘ईटीव्ही भारत’ने प्रसिद्ध केली होती. त्याची दखल बँक ऑफ महाराष्ट्रने घेतली असून बँकेबाहेर लागणाऱ्या रांगा कमी केल्या आहेत.

महाराष्ट्र बँकेबाहेरील गर्दी कमी झाली
महाराष्ट्र बँकेबाहेरील गर्दी कमी झाली
author img

By

Published : May 26, 2020, 7:15 PM IST

मुंबई - शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना घाटकोपर, पंतनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्र बाहेर ग्राहकांनी रांगा लावल्याची बातमी ‘ईटीव्ही भारत’ने प्रसिद्ध केली होती. त्याची दखल बँक ऑफ महाराष्ट्रने घेतली असून बँकेबाहेर लागणाऱ्या रांगा कमी केल्या आहेत. यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याला काही प्रमाणात आळा घालता येणार असल्याने घाटकोपरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.

मुंबईमध्ये कोरोना विषाणूचे रोज 1200 ते 1700 रुग्ण आढळून येत आहेत. मागील आठवड्यात सर्वाधिक रुग्ण घाटकोपरच्या एन विभागाच्या हद्दीत आढळून आले आहेत. त्याच दरम्यान घाटकोपर पंतनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्र बाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. एटीएम, पैसे भरण्याची मशीन बंद असल्याने तसेच वयोवृद्ध ग्राहक पेन्शनचे पैसे काढण्यास बँकेत येत असल्याने ग्राहकांच्या रांगा लागत होत्या.

एटीएम, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग सुविधा असल्या तरी ग्राहक या सुविधा वापरत नसल्याने रांगा लागत होत्या. वयोवृद्ध ग्राहकांकडून पेन्शनमधील रक्कम काढण्यासाठी वारंवार रांग लावली जात होती. यामुळे ही गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे बँकेचे म्हणणे होते. याठिकाणी लागणाऱ्या रांगामुळे सुरक्षित अंतराचा फज्जा उडाला होता, तसेच गर्दी होत असल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची भीती होती.

याबाबतची बातमी ‘ईटीव्ही भारत’ने प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत बँकेने आपल्या एटीएम तसेच पैसे भरण्याच्या मशीन वेळेवर सुरू कशा राहतील, याची उपाययोजना केली आहे. बँकेत ग्राहकांनी वारंवार येऊ नये म्हणून ग्राहकाने एकदाच पैसे काढण्यास सांगितले जात आहे. यामुळे बँकेबाहेर होणारी गर्दी कमी झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.