मुंबई: मुंबईला येणाऱ्या धमक्यांचे कॉल आणि मेसेजेस या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सणासुदीच्या तोडांवर एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या दरम्यान वाजवल्या जाणाऱ्या फटाक्यांसंदर्भात मुंबई पोलिसांनी नवे आदेश काढले आहेत. या संदर्भात यापूर्वी जारी करण्यात आलेले कोणतेही आदेश असले, तरी जनतेला अडथळा, गैरसोय, त्रास, धोका किंवा नुकसान टाळण्यासाठी पोलीस उपायुक्त संजय लाटकर Deputy Commissioner of Police Sanjay Latkar यांनी हे आदेश दिले आहेत.
बंदी लागू करण्यात आली तसेच 16 ऑक्टोबर 2022 ते 14 नोव्हेंबर 2022 या कालावधीत मुंबईत आकाश कंदील उडवण्यावर बंदी घालण्याचा आदेश देखील जारी करण्यात आले आहेत. चायनीज फ्लाइंग कंदीलांच्या वापर आणि विक्री करण्यावर देखील 14 नोव्हेंबरपर्यंत बंदी लागू करण्यात आली आहे. मुंबईचे डीसीपी संजय लाटकर यांनी हे आदेश जारी केले आहेत. आकाशात कंदील उडवल्याने लोकांच्या जीव धोक्यात येऊ शकते, म्हणून हा आदेश जारी करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांचा आदेश मुंबईतील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही व्यक्तीस पोलीस आयुक्तांनी नियुक्त केलेल्या किंवा राज्य सरकारने नियुक्त केलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या परवान्याशिवाय कोणत्याही प्रकारचे फटाके विकणे, बाळगणे हस्तांतरण करणे, प्रदर्शन करणे, वाहतूक करणे यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश 16 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरपर्यंत अमलात येईल, असे पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी सांगितले आहे. फटाके म्हणजे 1983 च्या स्फोटके नियमांच्या खंड ७ मध्ये निर्दिष्ट केलेली स्फोटके यांचा समावेश आहे.
30 दिवसांसाठी बंदी या महिन्याच्या 16 ऑक्टोबरपासून मुंबईत उडत्या कंदीलांचा वापर आणि विक्री 30 दिवसांसाठी बंदी आणली आहे. चायनीज कंदील म्हणून समजल्या जाणाऱ्या फ्लाइंग कंदीलांचा वापर, विक्री आणि साठवणुकीवर 14 नोव्हेंबरपर्यंत बंदी लागू असेल. या आदेशाचे पालन न केल्यास मुंबई पोलीस त्याच्यावर भादंवि कलम 188 अन्वये कारवाई करणार आहेत.