ETV Bharat / state

राज्यभरात बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरू

सोमवारपासून दहावीच्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकांची राज्यातील सर्व भांडारांमधून विक्री सुरू करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तक मंडळाच्या भांडारात तसेच पुस्तक विक्रेत्यांकडे पाठ्यपुस्तके खरेदीसाठी गर्दी होऊ नये म्‍हणून टप्प्याटप्प्याने इतर इयत्तांच्याही पाठ्यपुस्तकांची विक्री सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

balbharti books
राज्यभरात बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरू
author img

By

Published : May 19, 2020, 7:41 AM IST

मुंबई - कोरोना आणि त्यानंतर निर्माण झालेल्या लॉकडाऊनमुळे रखडलेल्या पाठपुस्तकांचे सोमवारपासून राज्यभरात वितरण सुरू झाले आहे. यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पाठ्यपुस्तक मंडळाच्या मुंबई येथील गोरेगाव या विभागीय भांडारातून पाठ्यपुस्तकांच्या कार्यालयात जाऊन या वितरणाची सुरूवात केल्याचे जाहीर केले.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारतीची मार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या लाभार्थी असलेल्‍या विद्यार्थ्यांना सर्व विषयाची पुस्तके पुरविली जातात. यासाठी समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून आणि लाभार्थी नसलेल्या इ. 1 ली ते इ. 12 वी च्‍या विद्यार्थ्यांना खुल्या बाजारामध्‍ये पुस्तक विक्रेत्यांमार्फत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या वर्षी राज्यामध्ये समग्र शिक्षा अंतर्गत 5 कोटी 73 लाख 30 हजार 269 पाठ्यपुस्‍तके आणि बाजारातील विक्री अंतर्गत 3 कोटी 87 लाख 05 हजार पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात येणार आहेत.

सोमवारपासून दहावीच्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकांची राज्यातील सर्व भांडारांमधून विक्री सुरू करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तक मंडळाच्या भांडारात तसेच पुस्तक विक्रेत्यांकडे पाठ्यपुस्तके खरेदीसाठी गर्दी होऊ नये म्‍हणून टप्प्याटप्प्याने इतर इयत्तांच्याही पाठ्यपुस्तकांची विक्री सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीसाठी राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी अनुदानीत शाळांमधील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक मंडळाच्या विभागनिहाय भांडारांमार्फत पुढील प्रमाणे पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात येत आहे.

यात नागपूर विभागात 42,92,956 प्रती, अमरावती विभागात 62,73,284 प्रती, औरंगाबाद विभागात 63,57,592 प्रती, तसेच नाशिक विभागात 94,19,702 प्रती, गोरेगाव (मुंबई), 34,70,810 प्रती, कोल्हापूर विभागात 58,59,416 प्रती, लातूर विभागात 62,64,381 प्रती, पनवेल (रायगड) विभागात 51,01,804 प्रती आणि सर्वात जास्त प्रति या पुणे विभागात वितरीत केल्या जाणार असून‍ त्यांची संख्या ही 95,90,324 प्रती इतकी आहे.

संपूर्ण राज्यामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी च्या सर्व पाठ्यपुस्तकांची PDF File मंडळाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आल्‍या आहेत. आजपर्यंत इयत्ता 12 वी च्या 20 लाख 54 हजार 194 व इयत्ता 1 ली ते 11 वी च्या 61लाख 20हजार 753 PDF File डाऊनलोड केलेल्या आहेत. असे असुनसुद्धा मोठ्या प्रमाणात पाठ्यपुस्‍तकांची मागणी होत असल्‍याने आज पासून दहावी या महत्त्वाच्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकांची राज्यातील सर्व भांडारांमधून विक्री सुरू करण्यात आली आहे.

पुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्थांना भांडारात न येता ऑनलाईन पद्धतीने 24 तासात केव्हाही मंडळाकडे पुस्तकांची मागणी नोंदवता येणार आहे. त्यासाठी त्यांना कायमस्वरूपी युजर आय. डी. व पासवर्ड देण्यात येत असून त्‍याचा वापर करून पुस्तक विक्रेत्यांना मंडळाच्या sales.ebalbharati.in या संकेतस्थळावरून पाठ्यपुस्तकांची ऑनलाईन मागणी नोंदविता येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.