ETV Bharat / state

Balasaheb Thackeray : स्मृतिदिनानिमित्त सजले बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ; शोभिवंत फुलांच्या झाडांनी केली सजावट - बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ सजले

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Shiv Sena chief Balasaheb Thackeray ) यांचा आज स्मृतिदिन ( Balasaheb Thackeray Commemoration Day ) आहे. दादर शिवाजीपार्क येथील स्मृतीस्थळाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.

Balasaheb Thackeray
बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ सजले
author img

By

Published : Nov 17, 2022, 9:01 AM IST

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Shiv Sena chief Balasaheb Thackeray ) यांचा आज स्मृतिदिन ( Balasaheb Thackeray Commemoration Day ) आहे.आजच्या दिवशी दादर शिवाजीपार्क येथील स्मृतीस्थळाला शिवसैनिक मोठ्या प्रमाणात भेट देतात. या पार्श्वभूमीवर स्मृतीस्थळ खास पुण्याहून आणलेल्या शोभिवंत झाडांच्या फुलांनी सजवण्यात आले होते. आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.

बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वयाच्या ८६व्या वर्षी १७ नोव्हेंबर २०१२ रोजी निधन झाले. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदान आपल्या भाषणांनी गाजवले होते. यामुळे याच दादर शिवाजी पार्क मैदानात बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ उभारण्यात आले आहे. या स्मृतीस्थळाला २३ जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त तसेच आजच्या स्मृतिदिनी मोठ्या संख्येने शिवसैनिक भेट देवून बाळासाहेबांना अभिवादन करतात.

पुण्यातून सुशोभित झाडांची रोपे : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्मृतीस्थळ विविध शोभिवंत झाडांच्या फुलांनी सजवण्यात आले असून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सुशोभिकरण करण्यासाठी पुण्यातून सुशोभित झाडांची रोपे आणली आहेत. यामध्ये रेड पॉईंटसेटीया, यलो, पॉईंटसेटीया, झेंडू, आदी फुलझाडांचा समावेश आहे. यासाठी ३०० फुलझाडांची रोपटी ही रेड पॉईंटसेटीया आणि २५० यलो पॉईँटसेटीयाची आहेत. तर सफेद शेवंतीची, प्लांबेंगो आदींची रोपटी तसेच ग्रीन लॉन लावून स्मृतीस्थळ सुशोभित केल्याचे जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.