ETV Bharat / state

राज ठाकरेंना आलेल्या 'ईडी' नोटीसप्रकरणी 'या' नेत्यांनी उपस्थित केले प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने कोहिनूर मिलप्रकरणी नोटीस बजावली आहे. यासंदर्भात येत्या 22 ऑगस्टला ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश राज ठाकरेंना देण्यात आले आहेत. ईडीच्या या नोटीसवर अनेक नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

राज ठाकरे
author img

By

Published : Aug 19, 2019, 10:04 PM IST

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने कोहिनूर मिलप्रकरणी नोटीस बजावली आहे. यासंदर्भात येत्या 22 ऑगस्टला ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश राज ठाकरेंना देण्यात आले आहेत. याप्रकरणी राज ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांनाही ईडीकडून नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे. ईडीच्या या नोटीसवर अनेक नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

राज ठाकरेंवर दबाव आणण्यासाठी त्यांनी नोटीस - बाळासाहेब थोरात
विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत म्हणून, त्यांना ईडीच्या नोटीस बजावल्या जात असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या विरोधात काही प्रश्न उपस्थित केले होते. सरकार त्या प्रश्नांची उत्तरे देत नाही. राज ठाकरेंवर दबाव आणण्यासाठी त्यांनाही ईडीची नोटीस बजावली असल्याचे थोरात म्हणाले.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात असे घडत नव्हते - अजित पवार
सत्ताधाऱ्यांकडून यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचे वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने त्यांना ईडीने नोटीस बजावली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात असे कधी होत नव्हते असेही पवार म्हणाले.

भाजपविरोधी भूमिका घेतल्याने नोटीस - धनंजय मुंडे
राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीवेळी भाजप विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांना ईडीची नोटीस आल्याचे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. जिल्ह्यातील पैठण तालुक्यातून शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली. यावेळी तालुक्यातील बाळापूर येथे जाहीर सभेत बोलताना मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली.

विरोधकांवर सरकारचा दडपशाही - नवाब मलिक
सरकारच्या विरोधात प्रश्न उपस्थित केले म्हणून, विरोधकांवर दडपशाहीचा प्रकार सरकारकडून केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे. ही एक प्रकारे सरकारची दडपशाही असून याला आता जनताच उत्तर देईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मुंबई प्रदेशाध्यक्ष नवाब मलिक यांनी दिला.

काय आहे 'ईडी' प्रकरण

काय आहे 'ईडी' प्रकरण? बुडीत निघालेली 'आयएल अँड एफएस' कंपनी मागील काही महिन्यांपासून संकटात आहे. या कंपनीने अनेक ठिकाणी गुंतवणूक केली आहे. यापैकी एक म्हणजे दादरमधील कोहिनूर सीटीएनएल. आयएल अँण्ड एफएस ही एक नामवंत फायनान्स कंपनी होती. मात्र, कंपनीबाबत बऱ्याच तक्रारी असल्याने कंपनीविरोधात दिल्ली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आयएल अँण्ड एफएसने मुंबईतील एका कंपनीला मोठ्या प्रमाणात कर्ज दिल्याचे चौकशीदरम्यान उघडकीस आले. कोहिनूर स्क्वेअर टॉवर्सला उभं करण्यासाठी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशी यांनी गुंतवणूक केली होती. आयएल अँण्ड एफएसचा या व्यवहाराशी कसा संबंध आहे याची चौकशी सध्या ईडी करत आहे.उन्मेष जोशी यांच्या कंपनीला सुमारे 500 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते, ते कंपनीला चुकते करणे शक्य नसल्याने त्या 500 कोटी रुपयांच्या बदल्यात जागा घेण्याचा आयएल अँण्ड एफएस कंपनीने निर्णय घेतला. साधारण 2011 साली आयएल अँण्ड एफएसने उन्मेष यांच्या कंपनीकडून 500 कोटींची जागा घेतली. मात्र, या व्यवहाराबाबतची नोंदणी 2017 साली करण्यात आली. हा संशयास्पद व्यवहार असल्याचे ईडीच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.