ETV Bharat / state

Balasaheb Thorat on Loksabha Election : महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही लोकसभेच्या ४० जागा जिंकू-बाळासाहेब थोरात - निळवंडे प्रकल्पाचे श्रेय

काँग्रेस पक्षाचे दोन दिवशीय लोकसभा मतदार संघनिहाय बैठक सुरू आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार वाढला असून मंत्रालय भ्रष्टाचाराचा अड्डा बनले असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असून फक्त आणि फक्त मोठ मोठे इव्हेंट करुन इमेज तयार करण्याचे काम करत आहे, अशी टीका काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.

Balasaheb Thorat News
बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
author img

By

Published : Jun 3, 2023, 6:54 PM IST

मुंबई: राज्यातील सरकार जनतेच्या प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांच्या अवकाळी पावसाने झालेल्या पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मदत दिली गेली नाही. शेतीमालाला हमीभाव नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले तर दुसरीकडे जाचक अटीमुळे शेतकऱ्याना मदत मिळाली नाही. महागाई, बेरोजगारी, यावर उपाय करण्यापेक्षा शिंदे फडणवीस सरकार फक्त फक्त मोठे मोठे इव्हेंट करत स्वतःचे प्रतिमा निर्माण करीत आहे. जनतेला मात्र पोकळ घोषणा मिळाल्या. कर्नाटक राज्यातील भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले तर त्यापेक्षा जास्त शिंदे सरकार भ्रष्टाचारी आहे.

लोकांचा काँग्रेसवरचा विश्वास वाढला: लोकसभेच्या तयारीचा आढावा घेतला जात आहे. सकारात्मक चर्चा होत आहे. महाविकास म्हणून एकत्र लढून भाजपाला पराभूत करायचे आहे. ज्या जागा आमच्याकडे नाहीत पण त्या मतदारंसघात काँग्रेसची ताकद आहे. त्या जागा काँग्रेसला मिळाव्यात यासाठी आम्ही आग्रह धरु. राज्यातील जनता शिंदे सरकारवर नाराज आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही लोकसभेच्या ४० जागा जिंकू असे चित्र आहे. भारत जोडो पदयात्रेचा फायदा कर्नाटक निवडणुकीत पाहायला मिळाला, दुसरी पदयात्रा काढली तर त्याचा फायदा निश्चिचत होईल. पदयात्रामध्ये महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कष्टकरी यांच्या समस्यांवर चर्चा झाली आणि हेच निवडणुकीतील मुद्दे आहे.

ओडिशातील बालासोर बहनागा जवळ मोठा अपघात झाला. हा शतकातील मोठा अपघात आहे. अपघातात एकही बळी जाऊ नये अशीच अपेक्षा होती. मोदी सरकारने रेल्वे अपघात रोखण्यासाठी महाकवच मोठा गाजावाचा करुन सुरु केली. महाकवच कोठे गेले? अपघाताची जबाबदारी कोणावर असणार. रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा-काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात

निळवंडेचा श्रेय घेण्याचा प्रयत्न: निळवंडे प्रकल्प व्हावा हे आमचे स्वप्न. स्वप्न पूर्ण होत असल्याचा आम्हांला आनंद आहे. शासनदरबारी प्रकल्पासाठी सातत्याने आम्ही पाठपुरावा केल्यामुळे दुष्काळी भागाला पाणी मिळत आहे. निळवंडे प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा काही लोक केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा आरोप, बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. श्रेय पेक्षा लोकांना पाणी मिळत आहे ह्यात आम्हाला आनंद आहे.

हेही वाचा -

  1. Karnataka Election Result कर्नाटक निकालाने देशभरात परिवर्तनाची सुरुवात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात
  2. Balasaheb Thorat on Political Crisis मुख्यमंत्र्यांनी पदावर राहणे हे नैतिकतेला धरून नाही बाळासाहेब थोरात
  3. Maharashtra Ministry Expansion राज्यात लवकरच होणार मंत्रिमंडळाचा विस्तार जाणून घ्या कोणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.