ETV Bharat / state

देशाला इव्हेंटची नाही तर...बाळासाहेब थोरातांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

author img

By

Published : Apr 3, 2020, 12:33 PM IST

Updated : Apr 3, 2020, 1:04 PM IST

टाळी-थालीनंतर आता दिवे लावण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. देशाला इव्हेंटची नाही तर कोरोनाशी लढण्यासाठी हॉस्पिटल, व्हेंटिलेटर आणि टेस्टिंग लॅबची गरज आहे. स्थलांतरित कामगारांसाठी पॅकेज जाहीर करण्याची गरज आहे, असा टोला थोरात यांनी लगावला आहे.

Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक व्हिडीओ संदेश प्रसारित केला. कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी 5 एप्रिलला रविवारी रात्री घरात बसून दिव्यांचा झगमगाट करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी यावेळी केले आहे. यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे.

टाळी-थालीनंतर आता दिवे लावण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. देशाला इव्हेंटची नाही तर कोरोनाशी लढण्यासाठी हॉस्पिटल, व्हेंटिलेटर आणि टेस्टिंग लॅबची गरज आहे. स्थलांतरित कामगारांसाठी पॅकेज जाहीर करण्याची गरज आहे, असा टोला थोरात यांनी लगावला आहे. त्याबरोबरच त्यांनी हे असले पीआर स्टंट थांबवा आणि काहीतरी ठोस पावले उचला, असा सल्लाही दिला आहे.

  • After Taali-Thaali @PMOIndia now presenting the lighting of lamps event.
    The country doesn't need an event, it needs hospitals, ventilators & testing labs to fight #COVID19
    Livelihood package for daily wager and migrant worker.
    Stop these PR stunts & take some firm steps.

    — Balasaheb Thorat (@bb_thorat) April 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 5 एप्रिलला रविवारी रात्री 9 वाजता आपल्या घरातील सर्व लाईट्स बंद करून मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची टॉर्च लावा. यावेळी चारी दिशांना दिव्यांचा झगमगाट होईल. यावेळी हा प्रकाश आपल्याला देशातील कुणीही एकटे नसल्याचा संदेश देईल. मात्र, हे करत असताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन देखील आपल्याला करायचं आहे, असे मोदी म्हणाले.

दरम्यान, भारतामध्ये आत्तापर्यंत 2 हजार 301 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. तर 56 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 156 जण पूर्णत: बरे झाले आहेत. सर्वात जास्त रुग्ण केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात आढळून आले आहेत.

Last Updated : Apr 3, 2020, 1:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.