ETV Bharat / state

ज्येष्ठ नेत्यांमध्ये भेटीगाठी होतच असतात - बाळासाहेब थोरात

कोणत्याही ज्येष्ठ नेत्यांमध्ये भेटीगाठी या होतच असतात, त्यामुळे दिल्लीत आमचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांची भेट झाली, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.

बाळासाहेब थोरात
author img

By

Published : Nov 6, 2019, 4:25 PM IST

Updated : Nov 6, 2019, 5:02 PM IST

मुंबई - कोणत्याही ज्येष्ठ नेत्यांमध्ये भेटीगाठी या होतच असतात. त्यामुळे दिल्लीत आमचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्या भेटीमध्ये राज्यातील सत्ता स्थापनेबाबत कोणती चर्चा झाली असेल यात विशेष काही नाही, असे मला वाटत नसल्याचा निर्वाळा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत केला. तसेच पटेल यांनी यासाठी ट्विट केले आहे. राज्यात अस्थिर वातावरण असल्याने ही चर्चा असल्याचे ते म्हणाले.

बोलताना बाळासाहेव थोरात

दिल्लीत काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि भाजपचे नेते नितिन गडकरी यांच्या भेटीबाबत ते बोलत होते. राज्यात सेना-भाजपला जनतेने कौल दिला आहे. त्यांचे सरकार स्थापन व्हावे असे आम्हालाही वाटते. आज राज्यात जो पेच निर्माण झाला आहे, त्याला भाजप जबाबदार आहे. त्यात शिवसेनेकडून आम्हाला पाठींबा देण्याचा किंवा सत्तेत येण्याचा कुठलाही प्रस्ताव आम्हाला आला नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू होण्यापेक्षा जनतेचे सरकार बनायला हवे. राज्यात होत असलेल्या सर्व राजकीय घडामोडींकडे आमचे बारकाईने लक्ष आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज आमची मालिकार्जुन खरगे यांच्या सोबत आज बैठक होणार आहे. आम्ही चर्चा करणार आहोत, अशी माहितीही थोरात यांनी दिली. शिवसेनेकडून आपल्याकडे 170 जणांची यादी असल्याचा दावा करण्यात आला मात्र हा 170 चा आकडा त्यांच्याकडे कसा आला याचा मी शोध घेत असल्याचे थोरात म्हणाले.

Intro:ज्येष्ठ नेत्यांमध्ये भेटीगाठी होतच असतात- थोरात

बातमी मोजोवर पाठवली आहे

Body:ज्येष्ठ नेत्यांमध्ये भेटीगाठी होतच असतात- थोरात

Conclusion:
Last Updated : Nov 6, 2019, 5:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.