मुंबई - काँग्रेसच्या आमदारांना आमच्यासोबत चला म्हणून आमिष दाखवून त्रास दिला जात आहे, त्यामुळ आमचे काही आमदार हे जयपूरला गेले असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हटले आहे.
हेही वाचा - 'काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून अधिक काळ राहणे हा महाजनादेशाचा अपमान'
राज्यपाल सत्ता स्थापनेसाठी अजूनही मोठ्या पक्षांना का बोलावत नाहीत, हे कळत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांचा राज्यात बिकट प्रश्न असताना सध्याची परिस्थिती ही दुर्दैवी असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - बा विठ्ठला.. महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकऱ्यासह सर्व जनतेला सुखी ठेव; चंद्रकांत पाटलांचे विठ्ठलचरणी साकडे