ETV Bharat / state

शिवजयंतीवर राज्य सरकारचे निर्बंध; मनसेचा सरकारला इशारा - मनसे लेटेस्ट न्यूज

यंदाच्या शिवजयंतीवर कोरोनाचे सावट असल्याने राज्य सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. यातच मिरवणूक काढू नका, १०० पेक्षा जास्त जणांनी जमा होऊ नये, असे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.

शिवजयंतीवर राज्य सरकारचे निर्बंध
शिवजयंतीवर राज्य सरकारचे निर्बंध
author img

By

Published : Feb 13, 2021, 7:07 PM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने शिवजयंती साजरी करताना सरकारी मार्गदर्शक सूचनेचं पालन करावे, असे आदेश दिले आहेत. गृह विभागाने शिवजयंती कशी साजरी करावी याबाबत परिपत्रक काढले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षांकडून सडसडून टीका होत असताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

शिवजयंतीवर राज्य सरकारचे निर्बंध; मनसेचा सरकारला इशारा

बाळा नांदगावकर यांनी एक ट्वीट केलं आहे. 'शिवजयंती हा आपला वर्षातील सर्वात मोठा सण आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळं आपण आहोत. त्यांची जयंती साजरी करताना कसली बंधनं टाकताय. अजान स्पर्धा भरवणारे, बारची वेळ सारखी वाढवून देणारे, विविध निवडणुकीत करोना नियमांची पायमल्ली चालते आणि शिवजयंतीला नियमावली,' अशी टीका नांदगावकर यांनी केली आहे.

शिवप्रेमींमध्ये नाराजी

शिवजयंती म्हणले, की महाराष्ट्रात नवचैतन्य निर्माण होते, मात्र यंदाच्या शिवजयंतीवर कोरोनाचे सावट असल्याने राज्य सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. यातच मिरवणूक काढू नका, १०० पेक्षा जास्त जणांनी जमा होऊ नये, असे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.

राज्य सरकारला इशारा

छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण आहोत त्यांची जयंती साजरी करतांना कसली बंधने टाकताय. आजान स्पर्धा भरविणारे, बारची वेळसारखी वाढवून देणारे आणि विविध निवडणुकीत आणि पक्षाच्या कार्यक्रमात कोरोना नियमाची पायमल्ली चालते आणि शिवजयंतीला नियमावली असा प्रश्न नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे. त्याचसोबत आपल्या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करणार नाही तर काय टिपू सुलतानची साजरी करणार का? वेळीच ही नियमावली बदला, जनतेला गृहीत धरू नका, असा इशारा नांदगावकर यांनी राज्य सरकारला आणि अप्रत्यक्षपणे शिवसेनेला दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.