ETV Bharat / state

Bakri Eid kurbani : बकरी-ईदला कुर्बानीसाठी बकरे आणल्याने मिरा रोडमधील सोसायटीत राडा, पोलिसात तक्रार दाखल - मिरा रोडमधील सोसायटी

मुंबईतील मिरा रोडमधील एका सोसायटीत बकरी-ईदच्या कुर्बानीसाठी दोन बकरे आणण्यात आले होते. सोसायटीच्या लोकांना जेव्हा कुर्बानीसाठी बकरी आणण्यात आले असल्याची माहिती मिळाली तेव्हा सोसायटीमध्ये गोंधळ निर्माण झाला. दोन गटात वाद झाल्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आले होते. सोसायटीच्या आवारात आंदोलन करणाऱ्या लोकांना श्रीरामचे नारे दिले.

मिरा रोडमधील सोसायटीत आणले कुर्बानीसाठी बकरे

author img

By

Published : Jun 28, 2023, 11:09 AM IST

Updated : Jun 29, 2023, 9:47 AM IST

मिरा रोडमधील सोसायटीत आणले कुर्बानीसाठी बकरे

मुंबई : यंदा बकरी ईद आणि आषाढी एकादशी एकाच दिवशी आली आहे. या दरम्यान अनेक मुस्लीम नेत्यांनी बकरी ईदसाठी कुर्बानी देऊ नये, असे आवाहन केले. परंतु काही ठिकाणी मात्र कुर्बानीसाठी बोकड आणले जात आहे. अशीच घटना मिरा रोडमध्ये घडली आहे. मीरा रोड येथील एका सोसायटीमध्ये कुर्बानीसाठी 2 बकरे आणण्यात आले होते. सोसायटीमधील इतर लोकांना याची माहिती मिळाली तेव्हा गोंधळ घालण्यास सुरूवात झाली. यामुळे मीरा भाईंदर परिसरात तणावाचे वातावरण आहे. एका खासगी गृहनिर्माण वसाहतीमध्ये बकरी आणल्याच्या आरोपावरून पोलिसांनी 40 जणांविरुद्ध आयपीसीच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

  • Mumbai | "Our society had passed a rule that no livestock would be allowed inside the society, but they (some residents of the society) violated it and brought two goats inside. We are opposing it and will not allow it," says a resident of the society

    "We appeal to all to… pic.twitter.com/jfxQVyaLwJ

    — ANI (@ANI) June 28, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आमच्या सोसायटीमध्ये कोणतेही पशू आणण्यात येणार नाही, असा नियम केला होता, पण सोसायटीतील काही रहिवाशांनी) त्याचे उल्लंघन करून दोन शेळ्या आत आणल्या. आमचा त्याला विरोध आहे, असे रहिवाशाने सांगितले. आम्ही सर्वांना जातीय सलोखा राखण्याचे आणि समाजाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करतो, असे सोसायटीतील दुसऱ्या रहिवाशाने म्हटले आहे.

हनुमान चालिसा पठण : मीरा भाईंदरमधील जेपी नॉर्थ सोसायटीत कुर्बानीसाठी बकरे आणल्याची माहिती इतर लोकांनी झाली तेव्हा त्यांनी त्याचा विरोध केला. त्यानंतर सोसायटीचे सदस्य आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते आंदोलन करू लागले. दोन्ही गृप गोंधळ वाढू लागला. त्यानंतर कुर्बानीसाठी विरोध करणाऱ्या लोकांनी श्रीरामाच्या घोषणा देत हनुमान चालिसाचे पठण सुरू केले. सोसायटीमध्ये वाद वाढल्यानंतर काहींनी पोलिसांना बोलवले.

दोन बोकड आणले : हाती आलेल्या माहितीनुसार, मोहसीन शेख नावाच्या एका व्यक्तीने कुर्बानीसीठी दोन बोकड आणल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान सोसायटीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती आणि महिला लिफ्टमधून बोकड आणत असल्याचे दिसत आहे. सोसायटीमध्ये कुर्बानीसाठी बोकड आणल्याची माहिती इतर लोकांना झाली. त्यानंतर त्यांनी इमारतीच्या खाली आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलन करणाऱ्या काही लोकांनी हनुमान चालीसा पठण करण्यास सुरुवात केली. तसेच काही लोकांनी श्रीरामाचे नारे दिले.

पोलिसांना पाचारण : सोसायटीमधील लोक बोकड आणला म्हणून विरोध करू लागले होते.त्यानंतर दोन गटात वाद होऊ लागला. सोसायटीमधील काही मु्स्लीम लोकांनी आपल्या समुदायातील लोकांना बोलवले. त्यानंर हिंदू धर्माच्या लोकांना बजरंग दलाच्या लोकांना बोलवले. हळूहळू शकडो लोका सोसायटीच्या परिसरात जमा झाले आणि वाद वाढू लागला. परिसरात वाद वाढत असल्याचे दिसताच काहींनी बोलवले. पोलिसांनी कुर्बानीचा विरोध करणाऱया लोकांची समजूत काढत त्यांना शांत केले. परंतु मीरा भाईंदर परिसरात काहीसे तणावाचे वातावरण आहे. कुर्बानीसाठी जनावरे सोसायटीत आणण्याची परवानगी आहे का, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

दरवर्षी रहिवाशी पोलिसाकडून बकरी ठेवण्याची घेतो परवानगी- मंगळवारी सायंकाळी घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी भाईंदर परिसरात असलेल्या हाऊसिंग सोसायटीत धाव घेत रहिवाशांना सांगितली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, इमारतीमधील व्यक्ती दरवर्षी दरवर्षी बकरी ईदच्या अगोदर आपल्या घरी बकरी आणण्याच्या प्रक्रियेबद्दल पोलिसांना माहिती देतो. कारण त्याच्याकडे बकरी ठेवण्यासाठी दुसरी जागा नाही. रहिवाशी दुसऱ्या दिवशी बकरी घेऊन जातो. त्याच्या राहत्या घरी जनावराची कत्तल केली जात नाही, असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले. पोलिसांच्या उपस्थितीत बकऱ्यांना घराबाहेर काढण्यास सांगण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांचा बळाचा वापर : दरम्यान पोलिसांनी लोकांना सांगितले की, सोसायटीमध्ये कुर्बानी दिली जाऊ शकत नाही. तसेच होऊ देखील होऊ देणार नाही, जर झाले तर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करू असे पोलिसांनी सांगितले. आता बोकड येथून बाहेर न्यावीत असे पोलिसांनी सांगितले, असल्याचे म्हटले जात आहे. या गोंधळातसोसायटीमध्ये नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. पोलिसांनी मुस्लिमांचे म्हणणे ऐकून घेत हिंदू पक्ष आणि बजरंग दलाच्या लोकांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप हिंदू बाजूने करण्यात येत आहे. सोसायटीत बकरे आणणारे मोहसीन खान यांचा फोन रात्रीपासून नॉट रिचेबल असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

हेही वाचा -

  1. Bakri Eid 2023 : भोपाळच्या किंग बोकडाला तब्बल इतक्या रुपयांची बोली; मुंबईच्या व्यक्तीने केले खरेदी
  2. Hindu Muslim Unity : मुस्लिम हिंदू एकतेचे अनोखे उदाहरण; आषाढी एकादशी असल्याने ईदला 41 गावात होणार नाही कुर्बानी
  3. Ashadhi Ekadashi 2023: अनोखे हिंदु मुस्लिम ऐक्य, बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा 'या' गावात निर्णय

Last Updated : Jun 29, 2023, 9:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.