ETV Bharat / state

बहुजन मुक्ती पार्टीने बैलगाडी दुचाकी रिक्षा ढकलून नोंदवला वाढत्या महागाईचा निषेध - बहुजन मुक्ती पार्टी बद्दल बातमी

बहुजन मुक्ती पार्टीने जळगावात बैलगाडी, दुचाकी आणि रिक्षा ढकलून वाढत्या महागाईचा निषेध नोंदवला. आंदोलकांनी यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Bahujan Mukti Party pushes bullock carts, two-wheelers and rickshaws to protest rising inflation
बैलगाडी, दुचाकी आणि रिक्षा ढकलून नोंदवला वाढत्या महागाईचा निषेध; जळगावात बहुजन मुक्ती पार्टीचे लक्षवेधी आंदोलन
author img

By

Published : Jun 15, 2021, 4:46 PM IST

जळगाव - वाढत्या महागाईने सर्वसामान्य लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. इंधनासह दैनंदिन जीवनातील गरजेच्या वस्तूंचे भाव गगनाला भिडल्याने त्या गोरगरिबांच्या आवाक्याच्या बाहेर गेल्या आहेत. मात्र, तरीही केंद्र व राज्य सरकार वाढत्या महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही, असा आरोप करत महागाईचा निषेध नोंदवण्यासाठी मंगळवारी दुपारी जळगावात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी बैलगाडी, दुचाकी आणि रिक्षा ढकलून वाढत्या महागाईचा निषेध केला.

बैलगाडी, दुचाकी आणि रिक्षा ढकलून नोंदवला वाढत्या महागाईचा निषेध; जळगावात बहुजन मुक्ती पार्टीचे लक्षवेधी आंदोलन

आंदोलकांनी बैलगाडी, दुचाकी आणि रिक्षा ढकलून केली घोषणाबाजी -

शहरातील स्वातंत्र्य चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वाढत्या महागाईच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी मोर्चात बैलगाडी, दुचाकी तसेच रिक्षा आणल्या होत्या. विशेष म्हणजे, महागाईचा सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर किती परिणाम झाला आहे, इंधनाचे भाव आवाक्याबाहेर गेल्याने वाहने ढकलण्याची वेळ आली आहे, हे दर्शवण्यासाठी आंदोलकांनी बैलगाडी, दुचाकी आणि रिक्षा ढकलून, घोषणाबाजी करत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी-

आंदोलकांनी यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणला होता. मोर्चात महिलावर्गाचा सहभाग लक्षणीय होता. महिलांनी घरगुती गॅस सिलिंडर, खाद्यतेलाच्या किंमती भडकल्याने तीव्र नाराजी व्यक्त करत केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आगपाखड केली. वाढती महागाई त्वरित नियंत्रणात आणावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.

फ्लेक्सने वेधले शहरवासीयांचे लक्ष-

या मोर्चात आंदोलकांनी वाढत्या महागाईच्या भस्मासुराचा म्हणजेच राक्षसाचा एक फ्लेक्स देखील बैलगाडीवर लावला होता. या फ्लेक्सने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा महासचिव विजय सुरवाडे यांनी आंदोलनाची भूमिका मांडली. दरम्यान, मोर्चानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.