मुंबई : शिंदे फडणवीस शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई मेट्रो रेल्वे लाईन (Mumbai Metro Railway Station Facility) यामध्ये जनतेला वेगवान आणि जलद प्रवास तसेच खास सुविधा देण्याचा विचार शासनाने केलेला दिसतो. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३चे (Colaba Bandra Seepz Bhuyari Metro 3) काम सुरू असून या मार्गावरील २६ स्थानकांमध्ये आता पालकांना आपल्या बाळाचे डायपर बदलण्यासाठी खास व्यवस्था (Baby diaper changing facility Metro Station) असणार आहे. (Mumbai News)
26 स्थानकावर बाळाचे डायपर बदलण्याची सुविधा- मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कामाबाबत अनेक सवाल विरोधक उपस्थित करीत आहेत. आरे जंगल येथे कारशेड उभरण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका आहे. कारशेड संदर्भात ह्या शासनामार्फत जोरात काम सुरू आहे. या मार्गावरील २६ स्थानकांमध्ये उभारण्यात येणाऱ्या महिला व पुरुष प्रसाधनगृहात बाळाचे डायपर बदलण्याची सुविधा असणार आहे. या प्रकारची सेवा सुविधा देणारे मेट्रो-3 हे देशातील पहिले कॉर्पोरेशन असेल, असा दावाही या सुविधेच्या निमित्ताने करण्यात आला आहे.
स्वच्छतागृहात मुलांचे डायपर बदलण्याची सुविधा- यासंदर्भात मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाचे प्रवक्ते यांच्यासोबत ईटीव्ही भारतच्या वतीने संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, "मुंबई मेट्रो-3 मध्ये प्रथमच स्थानकातील पुरुषांच्या स्वच्छतागृहात लहान मुलांच्या डायपर बदलण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. आतापर्यंत भारतातील कोणत्याही मेट्रो स्थानकावर मुलांच्या डायपर चेजिंगची सुविधा पुरुषांच्या स्वच्छतागृहात नाही. मात्र आपण तो प्रयत्न सुरू करणार आहोत."