ETV Bharat / state

'आयुर्वेद व आधुनिक वैद्यकशास्त्र शाखांनी एकत्रित संशोधन कार्य करावे' - राज्यपाल बातमी

पुणे येथील भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टच्या एकात्मिक कर्करोग उपचार व संशोधन केंद्राने टाटा ट्रस्ट यांच्या आर्थिक सहकार्याने तयार केलेल्या आयुर्वेदिक ‘केमो रिकव्हरी किट’चे आज (दि. 27 सप्टें.) राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथून लोकार्पण कराण्यात आले.

उद्घाटन करताना राज्यपाल
उद्घाटन करताना राज्यपाल
author img

By

Published : Sep 27, 2020, 4:34 PM IST

Updated : Sep 27, 2020, 6:24 PM IST

मुंबई - आयुर्वेदाची गेल्या 50 ते 60 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात उपेक्षा झाली आहे. मात्र, आता आयुर्वेदाच्या पुनरुज्जीवनाचा काळ आला आहे. आयुर्वेद व आधुनिक वैद्यकशास्त्र दोघांचीही स्वतंत्र बलस्थाने आहेत. या शाखांनी एकत्रितपणे संशोधन कार्य केल्यास कर्करुग्णांना तसेच इतर रुग्णांना त्याचा मोठा लाभ होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. सध्या जगाला भेडसावत असलेल्या कोरोना संसर्गावर देखील आयुर्वेदाच्या माध्यमातून संशोधन होऊन उपचार शोधला जाईल, असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

पुणे येथील भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टच्या एकात्मिक कर्करोग उपचार व संशोधन केंद्राने टाटा ट्रस्ट यांच्या आर्थिक सहकार्याने तयार केलेल्या आयुर्वेदिक ‘केमो रिकव्हरी किट’चे आज (दि. 27 सप्टें.) राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथून लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. वैद्यकीय संशोधन कार्य हे सखोल व सातत्यपूर्ण झाले पाहिजे, असे सांगून आयुर्वेदातील संशोधन जागतिक स्तरावर नेण्यासाठी त्याचे पेटेंट दाखल झाले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. आयुर्वेदिक औषधांच्या प्रसारासाठी केवळ विपणन न करता संशोधनावर अधिक भर दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.

बोलताना राज्यपाल कोश्यारी
भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टतर्फे कर्करोग उपचारासाठी आयुर्वेदिक औषधांचे 7 पेटेंट दाखल केल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन करताना संस्थेच्या संशोधन कार्याशी टाटा ट्रस्ट जोडले असल्यामुळे संस्थेच्या कार्याला विश्वसनीयता लाभली आहे, असे राज्यपालांनी सांगितले. केमोथेरपी झालेल्या कर्करुग्णांना रुग्णांना अतिशय वेदना सहन कराव्या लागतात. केमो रिकव्हरी किटमधील आयुर्वेदिक औषधांमुळे रुग्णांना दिलासा मिळेल, असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला. उद्योगपती रतन टाटा यांनी व्हिडीओ संदेशातून संस्थेला शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा - '..म्हणून शिवसेनेसोबत सत्तास्थापनेची चर्चा नाही, 'त्या' अटीवर चर्चा करण्यासाठीच राऊत यांची भेट'

Last Updated : Sep 27, 2020, 6:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.