मुंबई Ayodhya Ram Mandir : खासदार संजय राऊत यांनी राम जन्मभूमीवरुन वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारलं असता, "मी मुर्खांना उत्तर देत नाही," अशी जोरदार टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली. "उद्धव ठाकरेंची सेना कोट्यवधी हिंदूंचा अपमान करत आहे. मात्र हिंदूंचा वारंवार अपमान करणं चूक आहे, देशातील करोडो हिंदूंवर आरोप करुन ही लोक आपलाच हशा करुन घेत आहेत" असा जोरदार हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
आज मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबादेवी मंदिरात स्वच्छता मोहीम राबवली, यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीही स्वच्छता केली.
मी मूर्खांना उत्तर देत नाही : अयोध्येतील राम मंदिराच्या जागेवरुन वाद निर्माण झालाय. उद्धव ठाकरे यांच्याकडून तसंच खासदार संजय राऊत यांच्याकडून या जागेबद्दल टीका केली जात आहे. त्यावर बोलताना देवेंद्र फडवणीस म्हणाले, "ज्यांचा राम मंदिराच्या आंदोलनामध्ये काहीही सहभाग नाही, असे लोक अशा पद्धतीचे आरोप करून स्वतःचं हसं करून घेत आहेत. कोट्यवधी हिंदूंचा अपमान करत आहेत. आता तरी ठाकरे सेनेने अशा प्रकारे हिंदूंचा अपमान करणं बंद करावं. माझा जीवनात हा सिद्धांत आहे की, मी मूर्खांना उत्तर देत नाही. पण एवढं नक्की सांगेन की वारंवार हिंदूंचा अपमान करणं आता तुम्ही सोडून द्या. तसंच अशा प्रकारच्या बाता करून करोडो हिंदूंच्या हृदयाला दुखावण्याचं काम उद्धव ठाकरे यांची सेना करत असून हे फार चुकीचं आहे " असंही फडणवीस म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प : अयोध्येत श्रीराम लल्लांची 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठापणा होत असून या निमित्तानं देशभरातील सर्व मंदिरं, प्रार्थनास्थळं स्वच्छ असावीत, असा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्या अनुषंगानं राज्यामध्ये सुद्धा सर्व धार्मिक स्थळं स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याच पद्धतीनं आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील आराध्य दैवत असलेल्या मुंबादेवी मंदिरात आणि परिसरात स्वच्छता केली. याप्रसंगी बोलताना त्यांनी अयोध्या राम मंदिरबाबत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाकडून वारंवार होत असलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं आहे.
देशभरातील प्रार्थना स्थळं स्वच्छ करण्याची मोहीम : अयोध्येत श्रीराम मंदिराचं उद्घाटन 22 जानेवारीला होत असून याप्रसंगी राम लल्लाची प्राणप्रतिष्ठापणा सुद्धा होणार आहे. हा दिवस भारतातील तमाम हिंदूंसाठी आस्थेचा, श्रध्देचा दिवस असल्यानं याप्रसंगी देशभरातील सर्व मंदिरं, प्रार्थनास्थळं स्वच्छ ठेवावीत, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासीयांना केलं आहे. राज्यात मुंबईत सुद्धा अशा पद्धतीची स्वच्छता मोहीम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात हाती घेण्यात आली. आज मुंबईचं आराध्य दैवत असलेल्या मुंबादेवी मंदिर परिसरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्वच्छता केली.
हेही वाचा :