ETV Bharat / state

औपचारिकता टाळा, माणकोली उड्डाणपुलाची मार्गिका खुली करा- मुख्यमंत्री ठाकरे - cm thackeray on Mankoli flyover road

केवळ अधिकृत उद्घाटन झाले नाही म्हणून उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवणे आणि वाहनधारकांची गैरसोय करणे बरोबर नाही, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला उद्घाटनाची वाट न पाहता पुलाची मार्गिका खुली करून वाहतूक सुरू करण्यास सांगितले.

मुख्यमंत्री ठाकरे
मुख्यमंत्री ठाकरे
author img

By

Published : Sep 21, 2020, 10:24 PM IST

मुंबई- उद्घाटनाची अधिकृत वाट न पाहता माणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करून वाहनधारकांची गैरसोय टाळावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमएमआरडीएला दिले आहे.

नाशिक महामार्गावर माणकोली येथील उड्डाणपुलाच्या ठाण्याच्या दिशेने डाव्या मार्गिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होणार होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, तसेच इतर लोकप्रतिनिधी यांच्या ऑनलाइन उपस्थितीत दुपारी दीड वाजता हे लोकार्पण होण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे एमएमआरडीएने आवश्यक ती तयारीही केली होती. मात्र, पहाटे भिवंडी येथे इमारत दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यांनी भिवंडी येथे धाव घेतली व मदत कार्य वेगाने सुरू झाले. त्यानंतर हा लोकार्पण कार्यक्रम रद्द करण्यात आला.

परंतू, केवळ अधिकृत उद्घाटन झाले नाही म्हणून उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवणे आणि वाहनधारकांची गैरसोय करणे बरोबर नाही, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला उद्घाटनाची वाट न पाहता पुलाची मार्गिका खुली करून वाहतूक सुरू करण्यास सांगितले.

हेही वाचा-अभिव्यक्ती स्वातंत्र्य व भाषण स्वातंत्र्याच्या मुलभूत हक्कांमध्ये अनिर्बंध असल्याचा गैरसमज - उच्च न्यायालय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.