मुंबई : हॉलिवूड चित्रपट, ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ने, ( Avatar The Way of Water ) रिलीज होण्याआधीच त्याच्या आगाऊ तिकीट विक्रीने ग्लोबल बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण केले होते. तब्बल १३ वर्षांच्या समर्पित निर्मितीसह, जेम्स कॅमेरूनने मंत्रमुग्ध करणार्या जादुई दुनियेत सर्वांना मग्न केले. या उत्सवाच्या हंगामात हा चित्रपट प्रेक्षकांची प्रथम क्रमांकाची पसंती झाला आहे.
अवतार चित्रपटाला प्रेक्षकांची पहिली पसंती : अवतार द वे ऑफ वॉटर हा सर्वांना आवडतोय हे त्याच्या बॉक्स ऑफिसच्या कलेक्शनवरून ( Avatar First Choice Of Audience ) समजते. जेम्स कॅमेरूनच्या कल्पनाशक्तीने अवतार फ्रँचायझी साकार झाली. अश्या प्रकारची उत्कृष्ट रचना तयार करण्यासाठी जागतिक चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी तसेच प्रेक्षकांनी त्यांचे कौतुक केले आहे.
दोन दिवसांत १०० कोटींचा गल्ला : भारतामध्ये ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ ने फक्त दोन दिवसांत १०० कोटींचा पल्ला गाठला ( Avatar Earned 100 Crores In Two Days ) आहे. तो अजून अनेक विक्रम मोडण्याची अपेक्षा आहे. तसेच जागतिक बाजारपेठेत ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ ने १५०० कोटींपेक्षा जास्तची कमाई केली आहे. या चित्रपटाला अप्रतिम रिव्ह्यूज मिळाले आहेत. ‘अ व्हिज्युअल ट्रीट’, ‘सुपरसाईज्ड ब्लॉकबस्टर’, ‘अप्रतिम सिनेमॅटिक जर्नी ’ सारख्या कॉमेंट्समुळे सकारात्मक शब्दांची माऊथ पब्लिसिटी मिळत आहे. अवतार द वे ऑफ वॉटर’ इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत डब करण्यात आला आहे.