मुंबई - मागील 5 वर्षांनंतर मुंबई महानगरातील टॅक्सी आणि रिक्षाचे भाडेवाढीसंदर्भात मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाची सोमवारी (दि. 22) बैठक पार पडली आहे. या बैठकीत मुंबई महानगरातील नवीन टॅक्सी, रिक्षा भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. नवीन दर वाढीनुसार पहिल्या टप्प्यासाठी रिक्षाचे भाडे 18 रुपयांवरून 21 रुपये तर टॅक्सीचे किमान 22 रुपयांवरून 25 रुपये झाले आहे. ही दर वाढ मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, पनवेल, वसई आणि विरार येथील रिक्षा व टॅक्सी प्रवासासाठी लागू असणार आहे.
आतापर्यत अधिकृत घोषणा नाही
पेट्रोल व डिझेलचे सतत दरवाढीमुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मोठा फटका बसलेला आहेत. त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील टॅक्सी व रिक्षा भाडे भाडेवाढीसंदर्भात मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाची सोमवारी बैठक पार पडली आहे. या बैठकीत मुंबई महानगरातील टॅक्सी व रिक्षा भाडे तीन रुपयांने भाडे वाढीचा प्रस्तावावार निर्णय घेतला आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. मात्र, आतापर्यत यावर अधिकृत घोषणा झालेली नाही.
असे असणार नवीन दर
नवीन दर वाढीमुळे दीड किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यासाठी टॅक्सीचे कमाल भाडे 22 रुपये असून त्यात 3 रुपयांची वाढ झाल्याने आता टॅक्सी भाडे 25 रुपये झाले आहे. तर रिक्षाचे किमान भाडे 18 रुपये असून त्यात 3 रुपयांची वाढ होऊन 21 रुपये रिक्षाचे भाडे होणार आहे. ही दर वाढ मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, पनवेल, वसई आणि विरार येथील रिक्षा व टॅक्सी प्रवासासाठी लागू असणार आहे. मुंबईत 48 हजार टॅक्सी असून त्यातील 25 हजारांहून कमी टॅक्सी प्रत्यक्षात रस्त्यावर धावत आहेत.
हेही वाचा - मनमानी करणाऱ्या शाळांवर कारवाई - शिक्षण मंत्री गायकवाड