मुंबई - औरंगाबादचे नामांतर हे होणारच. येणाऱ्या औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकी आधी नाव संभाजीनगर होईल, असे वक्तव्य माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले.
हेही वाचा - 'कंगनाविरुद्ध देशद्रोहाचा खटला चालवण्यासाठी राज्य किंवा केंद्र सरकारची परवानगी घ्या'
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी चंद्रकांत खैरे दादर येथील बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सदर माहिती दिली. मुंबई, ठाण्यानंतर बाळासाहेबांनी औरंगाबादला महत्व दिले. काही झाले तरी औरंगाबाद हे नाव काढून टाका. साहेबांनी संभाजीनगर हे नाव दिले होते. ते नेहमी औरंगाबादला संभाजीनगर या नावानेच बोलायचे. बाळासाहेब ठाकरेंचे संभाजीनगर हे आवडते शहर होते.
बाळासहेब म्हणाले दिल्ली जा, मी गेलो - खैरे
बाळासाहेब बोलले तू दिल्लीत जायचे, आणि मी दिल्लीत गेलो. काही झाले, कोणी काहीही म्हणले तरी औरंगाबादचे नाव संभाजीनगर होणारच. औरंगाबाद महापालिका निवडणुकी आधीच नामांतर होणार. नामांतराचे राजकारण काही जण करतील, त्याचा आमच्यावर काही फरक पडणार नाही. विरोध करणारे करतील, असेही खैरे यांनी सांगितले.
हेही वाचा - मुंबई : बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याच्या अनावरणावेळी शरद पवार राहणार उपस्थित