औरंगाबाद - पळशी येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांची गावकऱ्यांनी सुटका केली. गावकऱ्यांनी पुराच्या पाण्यात मानवी साखळी बनवली. यानंतर विद्यार्थ्यांना आधार मिळाला आणि ते पुरातून सुखरूप बाहेर आले.
विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर काल जोरदार पाऊस झाला होता. पावसामुळे अंधारी परिसरातील नाल्याला तुफान पूर आला. पूर ओसरत नसल्यामुळे गावकऱ्यांनी मानवी साखळी बनवत विद्यार्थ्यांची सुटका केली. दरम्यान, गावकऱ्यांनीच अंगाचा थरकाप उडवणारं रेस्क्यू ऑपरेशन राबवल्याचे दिसलं.