मुंबई: औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय महाविकास आघाडीने शेवटच्या कॅबिनेट बैठकीत घेतला होता. तो निर्णय शिंदे सरकारने रद्द केला आणि चर्चा सुरू झाल्या मात्र. आज झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत शहराच्या नामांतराचा निरर्णय पुन्हा घेण्यात आला आहे. त्यानुसार औरंगाबादचे नाव आता छत्रपती संभाजीनगर, आणि उस्मानाबादचे नाव धाराशीव तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यात आले आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
१२ हजार कोटींच्या रकमेस शासन हमी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक घेतली. यात औरंगाबादचे नामकरण 'छत्रपती संभाजीनगर' करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर उस्मानाबादचे नाव धाराशिव असे करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे. त्याचबरोबर नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे नामकरण करण्याचा निर्णय झाला आहे. एमएमआरडीएला ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे तसेच पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींच्या रकमेस शासन हमी देणार आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.
येवु नये यासाठी त्या निर्णयाला स्थगिती: पत्रकार परीषदेत निर्णया संदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, औरंगबाद चे नाव छत्रपती संभाजी नगर करम्याचा निर्णय घेतला आहे. 29 तारखेला सरकार ने काही निर्णय घेतले तेंव्हा सरकार अल्पमतात होते त्यामुळे कायदेशिर अडचण येवु नये यासाठी त्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. आजच्या बैठकीत नामांतराचा तसेच विमानतळाला नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात लवकरच विधी मंडळात ठराव घेऊन तो नंतर केंद्र सरकारला पाठवण्यात येणार आहे. एम एम आर डी ए अनेक प्रकल्प राबवत आहे. त्यासाठी 60 हजार कोटीचे कर्ज उभारण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी 12 हजार कोटी ची सरकार ने हमी दिली आहे
डिसलेच्या बाबतीत चुकीचा निर्णय होउ नये : यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आजच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ते मावळत्या सरकार ने घेतलेले मावळते निर्णय नाहीत तर ते उगवत्या सूर्याच्या साक्षीने नव्या सरकार ने घेतलेले निर्णय आहेत त्यांचा लाभ जनतेला होईल डिसले गुरुजी यांच्या संगर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की ते आज भेटायला आले होते त्यांनी मुख्यमंत्री आणि मी अशा दोघांचीही भेट घेतली. आंतरराष्टीय स्तरावर पुरस्कार मिळवलेल्या मानसाबद्दल कोणताही चुकीचा निर्णय घेतला जाऊ नये याबाबतचे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.
महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयांना स्थगिती : आजच्या बैठकीत नविन निर्णय झाले आहेत. मात्र राज्यामध्ये एकनाथ शिंदे सरकार आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Govt Decision) घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांना शिंदे सरकारने स्थगिती दिली. त्यामुळे आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील ठाकरे सरकारच्या आणखी काही निर्णयांना स्थगिती दिली जाईल का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत होती. मात्र या बैठकीत ठाकरे सरकारने घेतलेलेच निर्णय कायदेशीर अडचणीत अडकुनये या कारणावरुन बदलण्यात आले आहेत.
इतिहास तज्ज्ञांचा आक्षेप- शहराचे नाव संभाजीनगर करा या मागणीवरून सध्या राज्याचे राजकारण तापले आहे. याच मुद्द्यावरून गेल्या 34 वर्षांपासून अनेकवेळा संघर्ष निर्माण झाले. मात्र, संभाजीमहाराजांचे नाव देण्याचीच मागणी का केली गेली. याचे उत्तर बहुतांश लोकांना माहित नाही. शिवसेना ( Shivsena ) म्हणते हा याच शहरात संभाजी महाराजांचे हाल करून त्यांना मारण्यात आले, त्यामुळे शहराला त्यांचे नाव द्यावे. तर दुसरीकडे महाराज फक्त दोनदा शहरातून गेले त्यांना मारल्याचे पुरावे नाहीत, असे इतिहास तज्ञाचे म्हणणे आहे. ठाकरे सरकारने नामांतराचा निर्णय घेतला त्या नंतर नावावरुन विरोध सुरु झाला आहे.