मुंबई Shrimad Bhagwat Katha : राज्यपाल रमेश बैस यांनी श्री तुलसीजी महाराजांच्या श्रीमद भागवत कथेला उपस्थिती लावली. यावेळी रमेश बैस (Ramesh Bais) म्हणाले की, मी काही बोलण्यासाठी नाही तर श्रीमद भागवत कथा ऐकण्यासाठी आलो आहे. पण परमपूज्य तुलसीजी महाराज आणि स्मिता ठाकरे यांच्या सल्ल्यानुसार मी दोन शब्द सांगतो. भागवत कथा श्रवण करणे अत्यंत पवित्र आहे. मी जमिनीवर बसून कथा ऐकतो. आपला सनातन धर्म खूप जुना आणि पवित्र आहे. श्रीमद भागवत कथेच्या संयोजक स्मिता ठाकरे (Smita thackeray) यांनी सांगितलं की, प्रकृती अस्वास्थ्यामुळे रमेश बैस काल आले नाहीत, मात्र त्यांची प्रकृती बरी होताच ते भागवत कथा ऐकण्यासाठी आले. मुक्ती कल्चरल हबमध्ये त्यांची भेट झाली हे आमचे भाग्य आहे. राज्यपालजी अतिशय लक्षपूर्वक कथा ऐकतात.
जमिनीवर बसून भागवत कथा ऐकतात : तुलसीजी महाराज म्हणाले की, आम्ही सर्व राज्यपाल रमेश बैस यांचं स्वागत करतो. एवढ्या मोठ्या पदावर असूनही ते खूप चांगले व्यक्ती आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर हसू हृदयातून येते आणि ते डाउन टू अर्थ व्यक्ती आहेत. म्हणूनच त्यांनी जमिनीवर बसून भागवत कथा ऐकल्याबद्दल सांगितलं. मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की, तुम्हीही जमिनीवर बसण्याची सवय लावा. प्राणायाम करणेही महत्त्वाचे आहे. शरीरासाठी अन्न आवश्यक आहे. जर आपण कोणाशी चांगले बोलू शकत नसाल तर कोणाला वाईट बोलू नये. जसं अन्न असेल तसं मनही असेल. आपण आत्म्याचे पालन केले पाहिजे.
९ डिसेंबरपर्यंत भागवत कथेचे आयोजन : वृंदावनातून आलेले श्री तुळशीजी महाराज प्रथमच मायानगरी मुंबईत श्रीमद भागवत कथा सादर करत आहेत. अंधेरी पश्चिम येथील मॉडेल टाऊन येथील मुक्ती कल्चरल हब येथे ९ डिसेंबरपर्यंत या भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा -