ETV Bharat / state

Mumbai Crime : दिल्लीनंतर मुंबईतही एका तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न, दहिसर पोलिसांनी तरुणाला केली अटक - Amay Drekar

मुंबईतही एका तरुणीला जीवे मारण्याचा (Attempt to kill young woman in Mumbai) प्रयत्न झाला. दहिसर पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणाने आपल्या मैत्रिणीला पाण्याच्या टाकीवरून ढकलून दिले. त्यानंतर ती 18 फूट खाली पडली आणि ती गंभीर जखमी झाली. मुलगी रुग्णालयात दाखल आहे, तिच्यावर उपचार सुरू आहेत.

Mumbai
दिल्लीनंतर मुंबईतही एका तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न, दहिसर पोलिसांनी तरुणाला केली अटक
author img

By

Published : Nov 17, 2022, 5:31 PM IST

Updated : Nov 17, 2022, 7:17 PM IST

मुंबई- दिल्लीनंतर मुंबईतही एका तरुणीला जीवे मारण्याचा (Attempt to kill young woman in Mumbai) प्रयत्न झाला. दहिसर पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणाने आपल्या मैत्रिणीला पाण्याच्या टाकीवरून ढकलून दिले. त्यानंतर ती 18 फूट खाली पडली आणि ती गंभीर जखमी झाली. मुलगी रुग्णालयात दाखल आहे, तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सांगितले की, मुलगा आणि मुलगी दोघेही एकमेकांना सुमारे 10 वर्षांपासून ओळखतात. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झाले आणि मुलीला मुलाने ढकलले.

दिल्लीनंतर मुंबईतही एका तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न, दहिसर पोलिसांनी तरुणाला केली अटक

घटनेच्या वेळी दोघेही दारूच्या नशेत होते. मुलगी कॉल सेंटरमध्ये काम करते. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव अमय दरेकर (Amay Drekar) आहे. दोघेही कॉलेजपासून एकमेकांना ओळखतात. सध्या दहिसर पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपी मुलाला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.

मुंबई पोलीस झोन 12 च्या डीसीपी स्मिता पाटील (DCP Smita Patil) यांनी सांगितले की, दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 13 नोव्हेंबर रोजी एका मुलीसोबत अत्याचाराची घटना उघडकीस आली होती. दिंडोशी पोलिसांनी एफआयआर नोंदवून गुन्हा दहिसर पोलिसांकडे वर्ग केला. दहिसर पोलिसांकडे गुन्हा दाखल केल्यानंतर खुनाचा प्रयत्नाखाली आरोपी तरुणाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

काय आहे प्रकरण? या संदर्भात दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियांगी सिंग या तरुणीवर तिचा प्रियकर अमेय दरेकर आणि त्याची आई राधिका यांनी हल्ला केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रियांगी सिंग हिला इमारतीच्या गच्चीच्या टाकीवर नेऊन ढकलून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिच्या पायांना तसेच पाठीच्या मणक्याला फ्रॅक्चर झाले आहे.

पेट्रोल पंप चालत असलेले मनीष सिंग यांनी यासंदर्भात सांगितले की, पोलिसांनी मुलीचे कपडे द्यायला सांगितले आणि त्यानंतर फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार असल्याची माहिती दिली. तसेच सिंग यांच्या मालाड येथील घरी जाऊन अन्य तपशील ही पोलिसांनी नोंदवले आहेत. या संदर्भात बोलताना सिंग म्हणतात की, दिल्लीतील मुलीच्या प्रकरणात आरोपीने तिच्या शरीराचे अनेक तुकडे केले. माझ्या मुलीच्या बाबतीत तिला अमेय आणि त्याच्या आईने अर्धमेल ठेवलं होतं. पोलिसांनी मला दहिसर येथील एका उच्चभ्रू सोसायटीत नेले जिथे ही घटना पाण्याच्या टाकीवर घडली.

कशी घडली घटना? शनिवारी प्रियांगी कामावरून घरी परतली नाही आणि तिचा मोबाईल फोनही बंद येत होता. रविवारी सकाळी मॉर्निंग वॉक वरून परत आल्यानंतर घरी प्रियांगी बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडल्याचे दिसले. तिच्या डोक्यावर पायावर आणि घोट्यावर जखमा झाल्या होत्या. तिचे कपडे ओले असल्याचे कुटुबांच्या लक्षात आले. 5 सप्टेंबरला अमेयने प्रियांगीला ऑटो रिक्षात बसवून घरी आणल्यानंतर मारहाण केली. ड्रायव्हरने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता अमेयने त्यालाही धडक दिली. ही घटना इमारतीच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रकरणात अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी दिली आहे.

Last Updated : Nov 17, 2022, 7:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.