मुंबई : १९९३ प्रमाणे बॉम्बस्फोट होतील असा धमकीचा कॉल मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला काल आला होता. याप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) आरोपीला आज अटक करण्यात आली आहे. या आरोपीचे नाव नबी याहया खान उर्फ के. जी. एन. लाला. वय ५५ वर्षे असे (ATS Arrest Bomb Blasts Caller Arrest ) आहे.
बॉम्ब ब्लास्ट करण्याची धमकी : काल मुंबई पोलीस नियंत्रण कक्षास कॉलकरून मुंबई शहरात बॉम्ब ब्लास्ट करण्याची धमकी देणाऱ्या इसमास दहशतवाद विरोधी पथकाने शोधून काढले आहे. 7 जानेवारीला सायंकाळी 7.29 वाजता एका इसमाने मुंबई पोलीसाच्या मुख्य नियंत्रण कक्षातील १०० नंबर हेल्पलाईनवर कॉल करून १९९३ ला जसा बॉम्बब्लास्ट झाला तसा बॉम्ब ब्लास्ट २ महिन्यानंतर मुंबईमध्ये माहिम, भेंडीबाजार, नागपाडा, मदनपुरा याठिकाणी होणार ( Bomb blast 4 places Mumbai ) आहे. तसेच मुंबई मध्ये १९९३ सालासारख्या दंगली होणार ( riots Happend like 1993 ) आहेत. यासाठी बाहेरच्या राज्यातून लोकांना बॉम्बस्फोट आणि दंगली करण्यासाठी बोलविले आहे' असा संदेश मुंबई पोलीसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून दहशतवाद विरोधी पथकाच्या नियंत्रण कक्षास प्राप्त झाला होता.
के. जी. एन. ला. अटकेत : या कॉलच्या अनुषंगाने दहशतवाद विरोधी पथकाची ०२ पथके तयार करून चौकशीकामी रवाना करण्यात आली होती. नियंत्रण कक्षास आलेल्या कॉलच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषणकरून नियंत्रण कक्षास कॉल करणारा इसम नबी याहया खान उर्फ के. जी. एन. लाला. ( K G N Lala arrested ) वय ५५ वर्षे असून तो मालाड पूर्व येथील पठाणवाडी येथे राहणारा आहे.
मालाड रेल्वे स्टेशन परिसरातून अटक : आरोपी नबी याला मालाड रेल्वे स्टेशन परिसरातून शोधून काढले. या इसमाकडे केलेल्या चौकशीत त्याने मुंबई पोलीस नियंत्रण कक्षास धमकीचा कॉल केल्याचे सांगितलेले आहे. या इसमाविरूद मुंबईमध्ये जबरी चोरी, विनयभंग व अतिक्रमण असे १२ गुन्हे दाखल असून सन २०२१ मध्ये त्याला मालाड पोलीस ठाणे मार्फत तडीपार करण्यात आले होते. या इसमाविरूध्द आझाद मैदान पोलीस ठाण्यात भादंवि कलम ५०५ (१), ५०६ (२), १८२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला ( Nabi Yahaya Khan arrested ) आहे. एटीएसकडून या आरोपीला आझाद मैदान पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्हयाचा पुढील तपास आझाद मैदान पोलीस ठाणे करत आहेत.