मुंबई - महाराष्ट्रात, औरंगाबाद, मुंबई ,अमरावती नागपूर, नाशिक तसेच पुणे जिल्हा केंद्रावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 घेण्यात ( Assistant Motor Vehicle Inspector Main Exam ) आली होती. तिचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला ( Assistant Motor Vehicle Inspector Main Exam Result Declared ) आहे. या निकालानुसार राज्यासाठी एकूण 233 उमेदवारांची पदाकरता एमपीएससीने शिफारस केलेली आहे.
233 उमेदवारांची पदाकरिता शिफारस - या परीक्षेमध्ये राज्यातून प्रथम आलेले साळेकर अभिषेक भास्कर ठाणे तर पुणे जिल्ह्यातून प्रथम आलेले गांगर्डे कांतीलाल दिलीप तसेच महिला वर्गातून प्रथम आलेल्या नांदेड जिल्ह्यातील श्रीमती सूर्यवंशी सरला विनायकराव हे उमेदवार प्रथम श्रेणीमध्ये आलेले आहेत. ज्या एकूण 233 उमेदवारांची पदाकरिता शिफारस एमपीएससीने केलेली आहे .ती या निकालाच्या आधारे केलेली आहे. जेव्हा सर्व उमेदवारांची नियुक्ती होईल. त्यावेळी त्यांचे मूळ पात्रता प्रमाणपत्र तपासण्याच्या अटी शर्ती त्यांना लागू असतील .कोणती चुकीची अथवा खोटी अथवा असत्य माहिती आढळल्यास योग्य ती कारवाई करत उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द देखील करण्यात येईल असेही एमपीएससीने म्हटलेलं आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून त्या निकालानुसार अनाथ तसेच खेळाडू व मागास इत्यादी आरक्षित पदारांवर शिफारस पात्र उमेदवारांची शिफारस सक्षम प्राधिकरणाकडून तपासणी करण्याच्या अधीन राहून करण्यात येत आहे. तसेच प्रस्तुत परीक्षेचा निकाल समांतर आरक्षणाचे मुद्द्यावर तसेच अन्य मुद्या संदर्भात माननीय न्यायालयात व न्यायाधिकरणाकडे दाखल करण्यात आला विविध न्यायिक प्रकरणामधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे उपसचिव यांनी कळवलेला आहे. उपसचिवांनी हे देखील अधोरेखित केलेल आहे की,' प्रस्तुत निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तर पत्रिकेतील गुणांची पडताळणी करायची आहे; अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाइलवर पाठविल्याच्या दिनांक पासून दहा दिवसात आयोगाकडे ऑनलाइन पद्धतीने नियमानुसार अर्ज करणे आवश्यक आहे.