ETV Bharat / state

तृतीयपंथीयांच्या गुरूची हत्या; आरोपींना अटक - Tertiary guru murder accused arrested

मुंबई पोलीस झोन अकराचे डीसीपी विशाल ठाकूर यांनी सांगितले की, 24 फेब्रुवारीला दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास एका तृतीयपंथीयाचा खून झाला होता. या खुनात आरोपींनी हातोडी तसेच अन्य धारदार हत्यारांचा वापर केला होता. मृत व्यक्ती सूर्या हा तृतीयपंथीयांचा गुरु होता व त्यांना तो मदत करत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

dead surya
मृत सूर्या
author img

By

Published : Feb 27, 2021, 5:32 PM IST

मुंबई - गोरेगाव-पश्चिम येथील बांगुर नगर विभागातील एका तृतीयपंथीयाची दिवसाढवळ्या हत्या झाली होती. या हत्याकांडातील आरोपींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. सूर्या असे मृताचे नाव आहे.

मुंबई पोलीस झोन अकराचे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी सांगितले की, 24 फेब्रुवारीला दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास एका तृतीयपंथीयाचा खून झाला होता. या खुनात आरोपींनी हातोडी तसेच अन्य धारदार हत्यारांचा वापर केला होता. मृत व्यक्ती सूर्या हा तृतीयपंथीयांचा गुरु होता व त्यांना तो मदत करत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपींमध्ये धीरज राम भूषक विश्वकर्मा (वय 20), विनायक राजाराम यादव (वय 22), राजेश राजकुमार यादव (वय 23) आणि एका अल्पवयीन याचा समावेश आहे.

हेही वाचा - मंत्री संजय राठोडांविरोधात भाजप महिला मोर्चाचे पालघरमध्ये आंदोलन

सर्व आरोपी हे मृत व्यक्तीला ओळखणारे आणि आजूबाजूच्या विभागात राहणारे होते. यासोबतच आरोपी आणि मृत व्यक्ती यांच्यामध्ये छोट्याछोट्या कारणांवरून सतत वाद होत होते. याआधीही मृत व्यक्तीवर दोन-तीन वेळा हल्ला करण्यात आला होता. यानंतर 24 फेब्रुवारीला त्यांची हत्या करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.